
अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना जान्हवी कपूर ही कायमच दिसते.

जान्हवी कपूर हिच्याकडे मोठे कार कलेक्शन आहे. आता नुकतीच जान्हवी कपूर हिने अत्यंत महागडी कार खरेदी केलीये.

जान्हवी कपूर हिने Toyota Lexus ही घेतलीये. रिपोर्टनुसार ही कार महागड्या गाड्यांपैकी एक आहे. ही अत्यंत लग्झरी अशी गाडी आहे. ही कार तब्बल अडीच कोटीची आहे.

अशी एक चर्चा आहे की, जान्हवी कपूर हिला ही कार बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याने गिफ्ट केलीये. जान्हवी कपूर हिच्याकडे मोठे कारचे कलेक्शन आहे.

जान्हवी कपूरचा काही दिवसांपूर्वीच उलझ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही जान्हवी कपूर दिसली.