
मुंबई : अखेर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झालायं. विशेष म्हणजे शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर कमाई देखील जोरदार करून करिश्मा दाखवलायं. अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. कारण गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर(Box office) फेल गेले. त्यामध्ये आता आलिया आणि रणबीरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केलीयं.
रणबीर आणि आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास तब्बल 35-36 कोटींचे कलेक्शन केले आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली छाप सोडलीयं. विशेष म्हणजे ब्रह्मास्त्र चित्रपटाने रणबीरच्या संजूलाही मागे टाकत मोठे ओपनिंग कलेक्शन केले. संजूचे पहिल्या दिवसचे कलेक्शन 34.75 कोटी होते तर ब्रह्मास्त्र चित्रपटाने जवळपास 35-36 कोटी आहे. ब्रह्मास्त्र चित्रपट सर्व रेकाॅर्ड मोडून नवे रेकाॅर्ड तयार करेल असे सांगितले जातंय.
रिपोर्टनुसार, ब्रह्मास्त्र चित्रपटाने सर्व व्हर्जनचे मिळून 35-36 कोटींची कमाई केलीयं. विशेष म्हणजे सांगितले जात आहे की, यामध्ये हिंदी व्हर्जनची कमाई 32-33 कोटी आहे. यामध्ये आता विकेंड असल्यामुळे पुढील दोन दिवस चित्रपट असून चांगली कमाई करू शकणार असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शनिवार आणि रविवार लोकांना सुट्ट्या असल्याने चित्रपट हाऊसफुल चालण्याची शक्यता वर्तवली जातंय. हिंदी, मल्याळम, कन्नड, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज करण्यात आलायं.