Dia Mirza | दिया मिर्झाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, सोशल मीडियावर शेअर केला आनंद!

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने (Dia Mirza) अलीकडेच मुलाला जन्म दिला आहे. तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दीयाने मुलाच्या हाताच्या फोटोसह एक निवेदन शेअर केले आहे आणि सांगितले की, आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत.

Dia Mirza | दिया मिर्झाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, सोशल मीडियावर शेअर केला आनंद!
दिया मिर्झा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने (Dia Mirza) अलीकडेच मुलाला जन्म दिला आहे. तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दीयाने मुलाच्या हाताच्या फोटोसह एक निवेदन शेअर केले आहे आणि सांगितले की, आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत. दियाची ही पोस्ट शेअर पाहिल्यानंतर चाहते आणि सेलेब्स तिचे खूप अभिनंदन करत आहेत.

दियाने मुलाचा हात धरलेला फोटो शेअर केला आहे आणि एक पोस्ट शेअर केली आहे. इतकेच नाही तर तिने चाहत्यांना आपल्या मुलाचे नावही सांगितले आहे. दियाने आपल्या मुलाचे नाव अव्यान आझाद रेखी असे ठेवले आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले की, ‘जेव्हा आपण मुलाला जन्म देण्याचा निर्णय घ्याल तेव्हा हे लक्षात घ्या की तुमचे हृदय तुमच्या शरीराबाहेर वास्तव्य करणार आहे. यावेळी मी आणि वैभव आमच्या भावना व्यक्त करताना हाच विचार करत आहोत. आमचा काळजाचा तुकडा अव्यान आझाद रेखी यांचा जन्म 14 मे रोजी झाला. लवकर जन्माला येण्यापासून, नवजात आईसीयूमधील परिचारिका आणि डॉक्टरांनी आमच्या छोट्या बाळाची खूप काळजी घेतली आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

चाहत्यांचे मानले आभार

दियाने पुढे लिहिले की, मला माझ्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत. आपली काळजी आमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे, जर यापूर्वी ही बातमी सांगणे शक्य झाले तर आम्ही ते नक्कीच केले असते. आपल्या प्रेम, विश्वास आणि प्रार्थनांनबद्दल खूप धन्यवाद.’

सेलिब्रेटींनी केले अभिनंदन

अनेक सेलिब्रिटींनी दियाच्या पोस्टवर कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे. मलायका अरोरा यांनी हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. दुसरीकडे, बिपाशा बसूने लिहिले की, ‘प्रेम, प्रेम, प्रेम आणि खूप प्रेम.’

दिया मिर्झा आणि वैभव रेखा यांनी यावर्षी 15 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या दीड महिन्यानंतर दियाने आपण आई होणार असल्याची घोषणा केली होती. जेव्हा ती हनीमूनसाठी मालदीवमध्ये गेली, तेव्हा तिने बेबी बंप फ्लाँट करणारा एक फोटो शेअर केला आणि चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली. अनेकांनी गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर दियाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना योग्य उत्तर देऊन अभिनेत्रीने त्यांची बोलती बंद केली होती.

(Dia Mirza gives birth to Baby Boy Avyaan Azaad Rekhi)

हेही वाचा :

दिया मिर्झा होणार आई, मालदिवहून बेबी बंपचे फोटो पोस्ट

ना कन्यादान, ना पारंपरिक रितीरिवाज, मंगलाष्टिका म्हणायला महिला भटजी, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जगावेगळा विवाह सोहळा

Dia Mirza | 39 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाह, दीड महिन्यात बेबी बम्प, दिया मिर्झाच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI