Happy Birthday Deepak Dobriyal | आपल्या अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा अभिनेता दीपक डोब्रियाल, जाणून घ्या अभिनेत्याचा प्रवास…

| Updated on: Sep 01, 2021 | 7:44 AM

'तनु वेड्स मनु' चित्रपटातील ‘पप्पी जीं’चे पात्र कधीही विसरता येणार नाही. हे पात्र साकारणारा दीपक डोब्रियाल (Deepak Dobriyal) एक आनंदी आणि मुडी कलाकार आहे, ज्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Happy Birthday Deepak Dobriyal | आपल्या अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा अभिनेता दीपक डोब्रियाल, जाणून घ्या अभिनेत्याचा प्रवास...
दीपक डोब्रियाल
Follow us on

मुंबई : ‘तनु वेड्स मनु’ चित्रपटातील ‘पप्पी जीं’चे पात्र कधीही विसरता येणार नाही. हे पात्र साकारणारा दीपक डोब्रियाल (Deepak Dobriyal) एक आनंदी आणि मुडी कलाकार आहे, ज्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज (1 सप्टेंबर) दीपक आपला 45वा वाढदिवस साजरा करत आहे.

दीपकचा जन्म 1 सप्टेंबर 1975 रोजी काबरा, पौरी गढवाल (उत्तराखंड) येथे झाला. दीपक वयाच्या 5व्या वर्षी दिल्लीला आला आणि त्याने शालेय शिक्षण दिल्लीच्या कटवारिया सराय येथे वास्तव्य केले.

अभिनयात रस

अभिनेता दीपक डोब्रियालने 1994 मध्ये नाट्य दिग्दर्शक अरविंद गौर यांच्याकडून अभिनयाचा अभ्यास सुरू केला. अभ्यासाबरोबरच दीपकने अरविंद गौरसोबत ‘तुघलक’, ‘अंध युग’, ‘रक्त कल्याण’, ‘अंतिम समाधान’ अशी अनेक नाटके केली. नंतर दीपक दिल्लीहून मुंबईला आला आणि त्याने 2003 मध्ये विशाल भारद्वाज यांच्या ‘मकबूल’ चित्रपटात ‘थापा’ची छोटीशी भूमिका साकारली.

दीपक दीपक डोब्रियाल एक थिएटर अभिनेता होता, त्यामुळे बहुधा तो प्रत्येक पात्रावर खूप मेहनत घेतो. 2004 मध्ये तिग्मांशू धुलिया यांच्या ‘चरस-डी जॉइंट ऑपरेशन’ आणि 2005 मध्ये विशाल भारद्वाज यांच्या ‘ब्लू अम्ब्रेला’ मध्ये त्यांनी छोट्या भूमिका साकारल्या, मात्र या चित्रपटांनी त्याला विशेष अशी ओळख मिळवून दिली नाही.

‘या’ चित्रपटाने मिळाली खरी ओळख

त्यानंतर 2006 मध्ये दीपकला ‘ओंकारा’ या चित्रपटामधून खरी ओळख मिळाली. दीपकने चित्रपटात ‘राजोह तिवारी’ची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला 2007 मध्ये विशेष कामगिरीचा पुरस्कारही मिळाला होता.

2011 मध्ये पुन्हा एकदा दीपकचे नशीब चमकले, जेव्हा अभिनेत्याचा ‘तनु वेड्स मनु’ हा चित्रपट आला. ज्याचे प्रेक्षकांनी खूप तोंडभरून कौतुक केले आणि आनंद घेतला. त्यातील दीपकचे ‘पप्पी’ हे पात्र खूप प्रसिद्ध झाले आणि दीपकला त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट ‘विनोदी अभिनेत्या’चा स्टार गिल्ड पुरस्कारही मिळाला.

नकारात्मक भूमिकाही गाजली!

त्यानंतर दीपक ‘दबंग 2’ मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसला. पण या चित्रपटात चुन्नीची भूमिका साकारणाऱ्या दीपकला सर्वांनी चांगलीच पसंती दिली. 2015 मध्ये आलेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातही दीपक महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. या चित्रपटात तो सलमान खानचा खास मित्र कन्हैयाच्या भूमिकेत दिसला होता.

यासोबतच दीपक ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’मध्येही त्याच कॉमेडीसह दिसला. याशिवाय दीपकने ‘हिंदी मीडियम’ चित्रपटात एका गरीब श्याम प्रकाशची भूमिका साकारली होती.

हेही वाचा :

‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला…’, रसिका सुनीलच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव!

मौनी रॉय ठरली Oops मुमेंटची शिकार, अभिनेत्रीचा आऊटफिट पाहून नेटीझन्सही म्हणाले….

अनिरुद्धशी लग्न संजानाशी पण गृहप्रवेश मात्र अरुंधतीचा, पाहा ‘आई कुठे काय करते’मध्ये पुढे काय घडणार…

नवजात बाळासह नुसरत जहाँला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, यश दासगुप्ताच्या हातात दिसले अभिनेत्रीचे बाळ!