AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिरुद्धशी लग्न संजानाशी पण गृहप्रवेश मात्र अरुंधतीचा, पाहा ‘आई कुठे काय करते’मध्ये पुढे काय घडणार…

अरुंधतीच्या दबावानंतर अनिरुद्धने संजनाशी लग्न केलं. घरच्यांचा या सगळ्याला विरोध असतानाही हे लग्न आता पार पडले आहे. आता संजना देशमुख कुटुंबात गृह्प्रवेशाची तयारी करत आहे. दोघांची वरात देशमुखांच्या समृद्धी बंगल्यात आली आहे.

अनिरुद्धशी लग्न संजानाशी पण गृहप्रवेश मात्र अरुंधतीचा, पाहा ‘आई कुठे काय करते’मध्ये पुढे काय घडणार...
आई कुठे काय करते
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 12:17 PM
Share

मुंबई :  लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai kuthe Kay Karte) सध्या एका महत्वाच्या वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत आता अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला आहे. या नंतर आता संजनाने देखील शेखरपासून घटस्फोट मिळवला आहे. यानंतर ती घाईनेच अनिरुद्धसोबत लग्नाच्या मागे लागली आहे. मात्र, अनिरुधच्या मनात यावेळी देखील लग्नाचा विचार नाहीये आणि तो शक्यतो हे लग्न टाळण्याचा प्रयत्न करत आहे.

या कुटुंबकेंद्री मालिकेने घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनात स्थान मिळवले आहे. या वेळी ही मालिका टीआरपी शर्यतीतही अव्वल क्रमांकावर आहे. सध्या मालिकेत अनेक नवी वळणे येत असून, मालिका अतिशय मनोरंजक झाली आहे. मालिकेत सध्या अनिरुद्ध देशमुख आणि संजना याच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. मात्र आता या महत्वाच्या मुहूर्तावर देखील एक नवा हंगामा दिसणार आहे.

संजनाकडून देशमुख कुटुंबियांना अल्टीमेटम!

अनिरुद्ध पुन्हा गायब झालेला पाहून संजना प्रचंड संतापली. यावेळी तिने समृद्धी बंगल्यात येऊन तमाशा केला. संजनाने अनिरुद्धला फितवल्याचा आरोप अरुंधतीवर केला आहे. तूच अनिरुद्धला माझ्या विरोधात भडकवलंस आणि त्याला कुठेतरी पाठवलंस असा आरोप तिने अरुंधतीवर केला आहे. तसेच जर अनिरुद्ध आला नाही आणि आमचं लग्न झालं नाही तर मी संपूर्ण देशमुख कुटुंबाला सोडणार नाही, त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करेन, अशी धमकी देखील तिने यावेळी दिली होती. यावेळीच अरुंधतीला अनिरुद्धचा फोन येतो आणि ती त्याला घरात बोलावून घेते. यानंतर ती लग्न करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकते.

अरुंधतीच्या दबावामुळे अनिरुद्धला करावे लागले लग्न!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये अनिरुद्ध घरी परत आल्याचे दिसत आहे. मात्र, तो लग्नासाठी तयार नसल्याचे देखील कळते आहे. तर, याच वेळी संजना त्याला आता मागे फिरलास तर पोलिसांत तक्रार दाखल करेन, असे म्हणत धमकी देते. तर, आपल्या कुटुंबावर कोणताही कारवाईचा बडगा येऊ नये म्हणून अरुंधती देखील अनिरुध्वर लग्नासाठी दवब टाकते. तुम्हाला हे लग्न करावेच लागेल आता माघार घेता येणार नाही, असे तिने अनिरुद्धला ठणकावून सांगितले आहे. यानंतर दोघेही लग्न करताना दिसत आहेत.

लग्न तर पार पडलं, पण गृहप्रवेश…

अरुंधतीच्या दबावानंतर अनिरुद्धने संजनाशी लग्न केलं. घरच्यांचा या सगळ्याला विरोध असतानाही हे लग्न आता पार पडले आहे. आता संजना देशमुख कुटुंबात गृह्प्रवेशाची तयारी करत आहे. दोघांची वरात देशमुखांच्या समृद्धी बंगल्यात आली आहे. संजना माप ओलांडणार इतक्यात अनिरुद्धची आई या दोघांना गरात येण्यापासून रोखते. याचवेळी झालेल्या तु-तु-मै-मै दरम्यान आईंना चक्कर येते. इतक्यात अनिरुद्ध गळ्यातील हार काढून आईकडे धाव घेतो. इतक्यात बाहेर उभी असलेली अरुंधतीदेखील धावत आत येते आणि तिच्या पायाने ते माप ओलांडले जाते. यामुळेच आता लग्न जरी संजनाचं झालं असलं तरी, गृहप्रवेश मात्र पुन्हा अरुंधतीचाच झाला आहे.

पाहा प्रोमो :

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

हेही वाचा :

एकमेकांची साथ 25 वर्षांचा संसार, अनिरुद्ध आणि अरुंधती पुन्हा असे कधी हसतील का?, पाहा मिलिंद गवळींची खास पोस्ट

सर्वात उंचीवर असलेल्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला ‘बेलबॉटम’, आनंद व्यक्त करताना अक्षय कुमार म्हणाला…

जयंत पवार: वास्तवाशी भिडणारा पत्रकार, लेखक, नाटककार!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.