Aai Kuthe Kay Karte | संजनाची धमकी, अरुंधतीचा दबाव, अखेर अनिरुद्धला करावाच लागणार संजनाशी संसार! पाहा मालिकेचा नवा प्रोमो

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये अनिरुद्ध घरी परत आल्याचे दिसत आहे. मात्र, तो लग्नासाठी तयार नसल्याचे देखील कळते आहे. तर, याच वेळी संजना त्याला आता मागे फिरलास तर पोलिसांत तक्रार दाखल करेन, असे म्हणत धमकी देते.

Aai Kuthe Kay Karte | संजनाची धमकी, अरुंधतीचा दबाव, अखेर अनिरुद्धला करावाच लागणार संजनाशी संसार! पाहा मालिकेचा नवा प्रोमो
आई कुठे काय करते

मुंबई : लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai kuthe Kay Karte) सध्या एका महत्वाच्या वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत आता अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला आहे. या नंतर आता संजनाने देखील शेखरपासून घटस्फोट मिळवला आहे. यानंतर ती घाईनेच अनिरुद्धसोबत लग्नाच्या मागे लागली आहे. मात्र, अनिरुधच्या मनात यावेळी देखील लग्नाचा विचार नाहीये आणि तो शक्यतो हे लग्न टाळण्याचा प्रयत्न करत आहे.

या कुटुंबकेंद्री मालिकेने घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनात स्थान मिळवले आहे. या वेळी ही मालिका टीआरपी शर्यतीतही अव्वल क्रमांकावर आहे. सध्या मालिकेत अनेक नवी वळणे येत असून, मालिका अतिशय मनोरंजक झाली आहे. मालिकेत सध्या अनिरुद्ध देशमुख आणि संजना याच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. मात्र आता या महत्वाच्या मुहूर्तावर देखील एक नवा हंगामा दिसणार आहे.

लग्नाच्या दिवशीच अनिरुद्ध गायब!

नव्या प्रोमोमध्ये संजना अनिरुद्धच्या घरातील लोकांना कारवाईची धमकी देताना दिसली होती. खरंतर शस्त्रक्रियेनंतर अरुंधतीला देशमुख कुटुंबाने पुन्हा घरी आणले आहे. हे पाहून संजना चिडली आहे. याचमुळे चिडलेल्या संजनाने लगेच लग्न करण्याचा घाट घातला आहे. या योजनेनुसार तिने अवघ्या दोन दिवसांत त्यांच्या लग्नाची संपूर्ण तयारी केली. मात्र, ऐन लग्नाच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा अनिरुद्ध गायब झाला आहे. अनिरुद्ध कुठे आणि का गेलाय याबाबत कोणालाही माहिती नाहीये.

संजनाचा देशमुख कुटुंबियांना अल्टीमेटम!

अनिरुद्ध पुन्हा गायब झालेला पाहून संजना प्रचंड संतापली आहे. यावेळी तिने समृद्धी बंगल्यात येऊन तमाशा केला आहे. संजनाने अनिरुद्धला फितवल्याचा आरोप अरुंधतीवर केला आहे. तूच अनिरुद्धला माझ्या विरोधात भडकवलंस आणि त्याला कुठेतरी पाठवलंस असा आरोप तिने अरुंधतीवर केला आहे. तसेच जर अनिरुद्ध आला नाही आणि आमचं लग्न झालं नाही तर मी संपूर्ण देशमुख कुटुंबाला सोडणार नाही, त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करेन, अशी धमकी देखील तिने यावेळी दिली आहे. मात्र, देशमुखांना देखील अनिरुद्ध कुठे गेला आहे? आणि का गेला आहे, याबद्दल काहीही माहिती नाहीये.

अरुंधतीच्या दबावामुळे अनिरुद्धला करावे लागणार लग्न!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये अनिरुद्ध घरी परत आल्याचे दिसत आहे. मात्र, तो लग्नासाठी तयार नसल्याचे देखील कळते आहे. तर, याच वेळी संजना त्याला आता मागे फिरलास तर पोलिसांत तक्रार दाखल करेन, असे म्हणत धमकी देते. तर, आपल्या कुटुंबावर कोणताही कारवाईचा बडगा येऊ नये म्हणून अरुंधती देखील अनिरुध्वर लग्नासाठी दवब टाकते. तुम्हाला हे लग्न करावेच लागेल आता माघार घेता येणार नाही, असे तिने अनिरुद्धला ठणकावून सांगितले आहे. यानंतर दोघेही लग्न करताना दिसत आहेत. मात्र आता पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

पाहा नवा प्रोमो :

हेही वाचा :

 एकमेकांची साथ 25 वर्षांचा संसार, अनिरुद्ध आणि अरुंधती पुन्हा असे कधी हसतील का?, पाहा मिलिंद गवळींची खास पोस्ट

सर्वात उंचीवर असलेल्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला ‘बेलबॉटम’, आनंद व्यक्त करताना अक्षय कुमार म्हणाला…

जयंत पवार: वास्तवाशी भिडणारा पत्रकार, लेखक, नाटककार!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI