AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड हादरलं! वाल्मिक कराडच्या समर्थकाकडून गोळीबार

बीड - किरकोळ कारणावरून वाल्मीक कराडचा समर्थक सफवान खानने गोळीबार केला, पैशाच्या जीवावर तो दहशत माजवतोय, आमच्या दिशेने चार राऊंड त्याने फायर केले- पीडित तरुण.

बीड हादरलं! वाल्मिक कराडच्या समर्थकाकडून गोळीबार
walmik karad Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2026 | 7:24 PM
Share

Walmik Karad : गुन्हेगारी जगत, खून प्रकरणं, मारहाण यामुळे बीड जिल्हा हा राज्याच्या केंद्रस्थानी आला. वाल्मिक कराडची प्रकरणं समोर आल्यानंतर या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला. दरम्यान, सध्या वाल्मिक कराड हा तुरुंगात आहे. त्याची टोळीदेखील तुरुंगात आहे. परंतु त्याची दहशत अजूनही कायम आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण नुकतेच किरकोळ कारणावरून वाल्मीक कराडचा समर्थक सफवान खानने गोळीबार केला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

थेट गोळीबार करायला सुरुवात केली

मिळालेल्या माहितीनुसार किरकोळ कारणावरून दोन गटातील तरुणांमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी एका तरुणाने फोन करून सफवान खान याला बोलावून घेतले. त्याने गाडीतून उतरताच थेट गोळीबार करायला सुरुवात केली, असे म्हटले जात आहे. पीडीत सरोज खान, जरीफ खान हे या प्रकरणात पीडित आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार सफवान खानने त्यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या.  यापूर्वी देखील त्याने राडा केला होता, अशी माहिती या पीडितांनी दिली आहे. तसेच त्याला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी संबंधित पीडितांनी केली आहे.

सफवान खानच्या हातात वाल्मिक कराडचा फोटो

दरम्यान कराडचा समर्थक सफवान खान याच्या अनेक रिल्स आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये तो हातामध्ये बंदूक घेऊन फिरत असल्याचे दिसत आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात देखील तो कराडचा फोटो घेऊन पुढे चालत असल्याचे समोर आले होते. वाल्मिक कराड सोबतही त्याच्या काही रील व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर अवैध शस्त्रांसोबतच्या रील व्हायरल करून तो दहशत माजवत असल्याचे दावा केला जातोय. या गोळीबारानंतर पुन्हा एकदा बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडमध्ये नेमकं काय चाललंय? तेथील पोलीस यंत्रणा नेमकी काय करत आहे? असेही बोलले जात आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?