AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पवार: वास्तवाशी भिडणारा पत्रकार, लेखक, नाटककार!

ज्येष्ठ नाटककार, पत्रकार आणि लेखक जयंत पवार यांचं निधन झालं. संवेदनशील पत्रकार आणि नाटककार आपल्यातून निघून गेला... नवोदित कवी, नाटककारांचा आधारवड गेला... (Veteran Journalist, Playwright Jayant Pawar Passes Away)

जयंत पवार: वास्तवाशी भिडणारा पत्रकार, लेखक, नाटककार!
Jayant Pawar
| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 11:21 AM
Share

मुंबई: ज्येष्ठ नाटककार, पत्रकार आणि लेखक जयंत पवार यांचं निधन झालं. संवेदनशील पत्रकार आणि नाटककार आपल्यातून निघून गेला… नवोदित कवी, नाटककारांचा आधारवड गेला… मध्यमवर्गीय, गिरणी कामगारांच्या दु:खांना आपल्या नाटकातून वाट मोकळी करून देणारा नाटककार गेला… अस्वस्थ वर्तमानावर परखड ओरखडे ओढणारा भाष्यकार, मार्गदर्शक गेला… अशी भावना आज पत्रकारिता आणि नाट्यक्षेत्रातून व्यक्त होत आहे. वास्तवाशी भिडणारे नाटककार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने पत्रकारिता आणि नाट्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. (Veteran Journalist, Playwright Jayant Pawar Passes Away)

2014 च्या जानेवारी महिन्यात 10 ते 12 या तारखांना महाड येथे झालेल्या 15व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष होते. ’फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी त्यांना 2012 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक), दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह), बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भाषाविषयक), माझे घर, वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह), वंश, शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक) होड्या (एकांकिका) या त्यांच्या कलाकृती संस्मरणीय ठरल्या आहेत.

स्वत:च्या 14 एकांकिकांचाच एकमेकांशी स्पर्धा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या ‘महाराष्ट्र रंगभूमी’तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले. ‘प्रयोग मालाड’ या नाट्यसंस्थेने 13-14 ऑक्टोबर 2018 या दिवसांत ‘लेखक एक, नाट्यछटा अनेक’ या नावाखाली एकांकिका स्पर्धां आयोजित केल्या होत्या. स्पर्धांच्या अंतिम फेरीमध्ये जयंत पवार यांच्या 14 एकांकिकांमध्ये आपआपसात सामना झाला. हा कार्यक्रम मुंबई-बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचे मिनी थिएटर येथे होता. अश्या स्पर्धांचे हे पाचवे वर्ष होते.

जयंतचं असणं खूप महत्त्वाचं होतं…

शेवटी आज तो दिवस उजाडलाच. नको असलेली बातमी आलीच. ज्याने लिहिलेलं प्रत्येक अक्षर आपल्याला आपलंच वाटावं, ते काळजात साठवून ठेवावं असं वाटणारा आत्मीय लेखक आपल्यातून निघून गेला! जयंत पवारचं जाणं मराठीसाठी, आपल्या सर्वांसाठी किती हानी करणारं आहे हे ठरवायला काळ जायला नकोय, ते आताही जाणवतंय. निव्वळ कथा वा नाटकासाठी नव्हे, सर्वार्थाने आजच्या या संभ्रमाच्या वर्तमानात एक स्वच्छ, ठाम भूमिका असलेला लेखक आपल्यासोबत आपल्या आसपास आहे, कधीही साद घालावी नि बाकी काही न सांगताही तो आपल्याला समजून घेऊ शकतो, धीर देऊ शकतो, या विश्वासासाठीही जयंतचं असणं खूप महत्त्वाचं होतं. फारच कमी माणसं दिसतायत आता अशी आसपास उरलेली. जगण्याची इतकी आस्थेवाईक समज असलेली. क्रूर काळ आपल्या कराल दाढेत एकेक मोठाच घास घेत चाललाय! खूप भयंकर आहे हे. निव्वळ निव्वळ अस्वस्थ करणारं वर्तमान… अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध लेखक, कवी प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केली आहे.

साक्षेपी लेखक आणि नाटककार गमावला: देशमुख

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक, नाटककार जयंत पवार यांच्या निधनामुळे आपण संवेदनशील आणि साक्षेपी लेखक आणि नाटककार गमावला असल्याची भावना संस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले पवार यांनी मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविलेले होते. जयंत पवार यांनी नेहमीच रंगभूमीवर काहीतरी वेगळे आणण्याचा प्रयत्न केला. अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक), दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह), बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक), माझे घर, वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह), वंश, शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक) होड्या (एकांकिका) या त्यांच्या कलाकृती सर्वांच्या स्मरणात राहतील, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा नाटककार: पवार

साहित्य अकादमी’ पुरस्कारविजेते साहित्यिक, ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, दुर्बल-वंचिताचं जगणं नाटकातून, साहित्यातून जिवंत करणारा सिद्धहस्त लेखक, पुरोगामी, विद्रोही व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, सामाजिक विषयांची आशयघन मांडणी करुन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी नाट्यक्षेत्र समृद्ध केलं. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक विषय समर्थपणे हाताळले. समाजातील वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी लेखणीतून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं. जयंत पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या नाट्य, साहित्य, पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असं पवार यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.

पवारांची नाट्यसंपदा

अधांतर काय डेंजर वारा सुटलाय टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक) दरवेशी (एकांकिका) पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप) फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह) बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक) माझे घर वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह) वंश शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक) होड्या (एकांकिका) (Veteran Journalist, Playwright Jayant Pawar Passes Away)

संबंधित बातम्या:

Jayant Pawar | ज्येष्ठ पत्रकार, नाटककार जयंत पवार यांचे निधन

Viral: ‘हा’ डान्सचा व्हीडिओ पाहिलात का, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

VIDEO | पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचा कार्यक्रमाला उशीर, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी मंच सोडला

(Veteran Journalist, Playwright Jayant Pawar Passes Away)

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.