VIDEO | पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचा कार्यक्रमाला उशीर, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी मंच सोडला

राज्याचे मंत्री महोदय येत असताना प्रोटोकॉलप्रमाणे तालुक्यातील लोकप्रतिनिधी या नात्याने विद्यमान आमदाराला त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहायचे असते, पण राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके स्वागतासाठी आलेच नाहीत

VIDEO | पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचा कार्यक्रमाला उशीर, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी मंच सोडला
नाराज अब्दुल सत्तार यांनी स्टेज सोडले


पुणे : महाविकास आघाडीचा धर्म पाळून जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचा सरपंच आणि शिवसेनेचा उपसरपंच झाला. त्यानंतर शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना पुण्यातील पारगाव येथील नवीन ग्रामसंसद ग्राम पंचायत कार्यालय आणि शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केले. मात्र स्वागतासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार अतुल बेनके (Atul Benke) वेळेवर न आल्याने अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रमादरम्यानच स्टेज सोडला.

नेमकं काय घडलं?

अब्दुल सत्तार हे ठरलेल्या वेळेनुसार जुन्नर तालुक्यात मु. पो. पारगाव या ठिकाणी उपस्थित राहिले. तालुक्यात राज्याचे मंत्री महोदय येत असताना प्रोटोकॉलप्रमाणे तालुक्यातील लोकप्रतिनिधी या नात्याने विद्यमान आमदाराला त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहायचे असते, पण राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांची स्वागतासाठी उपस्थिती लावणं, तर लांबच राहिलं, ते कार्यक्रमालाही वेळेत आले नाहीत.

वाट पाहूनही बेनके येईना

आमदार बेनकेंची आपण 20-30 मिनिटे वाट पाहू, तोवर शाखेचे उद्घाटन करुन आपण व्यासपीठावर प्रास्ताविक मनोगताला सुरुवात करु, आमदार आल्यानंतर नूतन ग्रामसंसद ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन करु, असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलं. कार्यक्रमाला सुरुवात झाली, पण तरीही आमदार अतुल बेनके वेळेवर न आल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यानी कार्यक्रमादरम्यान स्टेज सोडून जाणे पसंद केले. मात्र या घटनाक्रमाबददल स्थानिक शिवसेना कायकर्त्यांनी शिवसेनेच्या घोषणा देत आपली नाराजी व्यक्त केली. आता महाविकास आघाडीत याचे राजकीय पडसाद उमटणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

असे काम तुमच्या बापाने कधी केले होते का?; अब्दुल सत्तार जेव्हा अधिकाऱ्यांवर भडकतात…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI