Jayant Pawar | ज्येष्ठ पत्रकार, नाटककार जयंत पवार यांचे निधन

जयंत पवार हे पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले.

Jayant Pawar | ज्येष्ठ पत्रकार, नाटककार जयंत पवार यांचे निधन
Jayant Pawar

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन झाले. अस्वस्थ वाटू लागल्याने जयंत पवार यांना शनिवारी मध्यरात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 61 व्या वर्षी त्यांनी एक्झिट घेतली. जयंत पवारांच्या निधनाने साहित्य आणि नाट्य वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी – लेखिका संध्या नरे आणि कन्या असा परिवार आहे.

जयंत पवार यांचा परिचय

जयंत पवार हे पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या ‘महाराष्ट्र रंगभूमी’तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले.

2014 च्या जानेवारी महिन्यात महाड येथे झालेल्या 15 व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
जयंत पवार यांना ’फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी 2012 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

‘प्रयोग मालाड’ या नाट्यसंस्थेने 13-14 ऑक्टोबर 2018 मध्ये ‘लेखक एक, नाट्यछटा अनेक’ या नावाखाली एकांकिका स्पर्धां आयोजित केल्या होत्या. स्पर्धांच्या अंतिम फेरीमध्ये जयंत पवार यांच्या 14 एकांकिकांमध्ये आपआपसात सामना झाला. हा कार्यक्रम मुंबई-बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचे मिनी थिएटर येथे होता.

जयंत पवार यांनी लिहिलेली नाटके

अधांतर

काय डेंजर वारा सुटलाय

टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक)

दरवेशी (एकांकिका)

पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप)

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)

बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक)

माझे घर

वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह)

वंश

शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक)

होड्या (एकांकिका)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI