AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?

मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?

| Updated on: Aug 12, 2026 | 3:57 PM
Share

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाचे, यावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी पक्षातील संघटनात्मक रचनेशी संबंधित अनेक मुद्दे न्यायालयासमोर मांडले.

या युक्तिवादावर कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली. “तुम्ही जे संघटनात्मक दावे करत आहात, ते बरोबर वाटत असल्याचे” कोर्टाने कपिल सिब्बल यांना म्हटले. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही सिब्बल यांनी गंभीर आरोप केले. “निवडणूक आयोगाने जे केले ते त्यांच्या कक्षाबाहेरचे आहे,” असे कपिल सिब्बल यांनी म्हटले.

यावेळी पक्षप्रमुखांच्या निवडीचा मुद्दाही चर्चेत आला. उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून झालेली नियुक्ती योग्य आणि लोकशाही पद्धतीने झाल्याचा दावा सिब्बल यांनी केला. त्यामुळे पक्षाची संघटनात्मक रचना आणि निर्णयप्रक्रिया महत्त्वाची असल्याचे त्यांच्या युक्तिवादातून स्पष्ट झाले.

दरम्यान, या प्रकरणात कोर्टाला “ग्राऊंड रीअॅलिटी बघायची आहे,” असेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आजच्या सुनावणीतील युक्तिवाद आणि कोर्टाच्या निरीक्षणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या सुनावणीमुळे ठाकरे गटाच्या दाव्याला न्यायालयीन प्रक्रियेत किती बळ मिळते, याची उत्सुकता वाढली आहे. आता सर्वांचे लक्ष आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतच्या या प्रकरणातील पुढील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.

Published on: Aug 12, 2026 03:45 PM

Follow Us