Honey Singh | बेशर्म रंग गाण्याच्या वादामध्ये हनी सिंह याची उडी, म्हणाला पहिलेचे लोक

इतकेच नाहीतर सातत्याने सोशल मीडियावर बॉयकॉट पठाणचा ट्रेंड सुरू आहे.

Honey Singh | बेशर्म रंग गाण्याच्या वादामध्ये हनी सिंह याची उडी, म्हणाला पहिलेचे लोक
| Updated on: Dec 23, 2022 | 5:46 PM

मुंबई : शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटातील बेशर्म रंग गाण्यामुळे मोठा वाद झालाय. बेशर्म रंग गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे या वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी या गाण्यावर टीका केलीये. इतकेच नाहीतर सातत्याने सोशल मीडियावर बॉयकॉट पठाणचा ट्रेंड सुरू आहे. अनेक बाॅलिवूड अभिनेत्यांनी बेशर्म रंग गाण्याचे समर्थन केले आहे. पूनम पांडे हिने देखील दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांचे बेशर्म रंग गाण्यासाठी काैतुक केले. इतकेच नाहीतर आता यामध्ये हनी सिंह याने देखील बेशर्म रंग गाण्याचे समर्थन केले.

हनी सिंह याने म्हटले आहे की, अगोदर प्रेक्षक हे अधिक समझदार होते. आता हनी सिंह याच्या या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहे. पठाण चित्रपटातील दुसरेही गाणे रिलीज करण्यात आले आहे.

हनी सिंह पुढे म्हणाला की, अगोदर अधिक स्वातंत्र्य होते. लोक कमी शिकलेले असतील पण त्यापेक्षा जास्त संवेदनशील होते. ते समजूतदार होते आणि यासर्व गोष्टींकडे ते मनोरंजन म्हणून बघत होते. खूप जास्त मनावर या गोष्टी घेत नव्हते.

पठाण चित्रपटाचा वाद सुरू असतानाच दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान हे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. पठाण चित्रपटानंतर लगेचच शाहरुख खानचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पठाण चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.