AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेद्दीत जान्हवी कपूरचे नको ते सीन… जया बच्चन भडकल्या, स्पष्टच म्हणाल्या, माझ्यासोबत असं वागण्याची…

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी सिनेमातील महिलांच्या वस्तुकरणाचा तीव्र निषेध केला आहे. जान्हवी कपूरच्या 'पेद्दी' चित्रपटातील भूमिकेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीतील एका प्रसंगाची आठवण करून दिली. करीना कपूरनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पेद्दीत जान्हवी कपूरचे नको ते सीन... जया बच्चन भडकल्या, स्पष्टच म्हणाल्या, माझ्यासोबत असं वागण्याची...
jaya bachchanImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 08, 2026 | 9:53 PM
Share

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी सिनेमात महिलांना केवळ एक ऑब्जेक्ट म्हणून दाखवण्याच्या कृत्याचा निषेध केला आहे. पेद्दीमधील जान्हवी कपूरच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जया बच्चन यांचं हे विधान आलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना जया बच्चन यांनी त्यांच्या करिअरच्या काळातील एक किस्साही सांगितला. एकदा एका दिग्दर्शकाने त्यांना एका सीनमध्ये गरजेपेक्षा अधिक सेक्सी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला त्यांनी कसा विरोध केला होता, याची माहितीही जया बच्चन यांनी दिली आहे.

पेद्दीमध्ये जान्हवी कपूरने अचियम्मा नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या व्यक्तीरेखेत जान्हवीला गरजेपेक्षा अधिक सेक्सी दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यावर टीका होत आहे. यावर अभिनेत्री करिना कपूरनेही प्रतिक्रिया दिली आहे. तर पेद्दीचे दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी माफी मागितली असून सिनेमातून ते सर्व सीन हटवले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तो वाईट अनुभव होता…

जया बच्चन यांनी संसदेत नेहमीच फिल्मी दुनियेशी संबंधित मुद्दे उपस्थित केले आहेत. पेद्दीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. अशा गोष्टींना सेटवरच विरोध केला पाहिजे. माझ्याबाबत असं घडलं होतं. तेव्हा मी तेव्हाच पावलं उचलली होती. त्यानंतर माझ्यासोबत असं वागण्याची कुणाची हिंमत झाली नाही, असं त्यांनी सांगितलं. दिग्दर्शकाने मला एक ऑब्जेक्ट म्हणून दाखवण्याचा माझा तो वाईट अनुभव होता. त्यानंतर मी त्याच्यासोबत पुन्हा कधीच काम केलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शोरमध्ये काय घडलं?

एका रिपोर्टनुसार, जया बच्चन या मनोज कुमार यांच्या शोर या सिनेमाबाबत बोलत होत्या. या सिनेमात त्यांनी सेक्स वर्करची भूमिका केली होती. ही व्यक्तीरेखा साकारताना जया बच्चन यांनी संपूर्ण सिनेमात घागरा चोली घालावी, असं डायरेक्टरचं मत होतं. पण जया बच्चन यांनी ओढणी घेण्याचाही हट्ट धरला. शरीर झाकलं जावं यासाठी ओढणी हवी, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे जया बच्चन आणि डायरेक्टरमध्ये वाद वाढला आणि मतभेद झाले.

करिनाने दिलं उदाहरण

करिना कपूरनेही जान्हवीच्या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निर्मात्यांनी यापूर्वीही महिलांना कमी कपडे न घालताही स्क्रीनवर कामूकता दाखवलेली आहे. कभी खूशी कभी गममधील सूरज हुआ मध्यम… या संपूर्ण गाण्यात काजोल साडीत दिसली. त्या गाण्यातील काजोल पाहा आणि चांदनी सिनेमातील तेरे मेरे होठों पे गाण्यामध्ये श्रीदेवी पाहा… या दोघींनीही बॉडी न दाखवता स्क्रीनवर आग लावली होती. आराधना सिनेमातील मेरे सपनो की रानी… या गाण्यात माझी सासू शर्मिला टागोर संपूर्ण कपड्यात होत्या. ते एक सेन्शूएलिटीचं उदाहरण होतं. मला वाटतं स्क्रीनवर सेन्शुअस दिसण्याचा कमी कपडे किंवा ऑब्जेक्ट दाखवण्याशी काहीच संबंध नाही, असं करिना कपूर म्हणाली.

Follow Us
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच