Katrina Kaif- Vicky Kaushal: कॅटरिना कैफने शेअर केला मेहंदीचा फोटो, चाहत्यांनी विचारला ‘हा’ खास प्रश्न!

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत. 9 डिसेंबर रोजी दोघांनी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स किल्ल्यामध्ये लग्न केले. लग्नानंतर विकी आणि कॅटरिना फंक्शनचे फोटो शेअर करत आहेत. लग्नानंतर ते हनिमूनला गेले होते.

Katrina Kaif- Vicky Kaushal: कॅटरिना कैफने शेअर केला मेहंदीचा फोटो, चाहत्यांनी विचारला हा खास प्रश्न!
कॅटरिना कैफ
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 9:35 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (katrina Kaif)  नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत. 9 डिसेंबर रोजी दोघांनी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स किल्ल्यामध्ये लग्न केले. लग्नानंतर विकी आणि कॅटरिना फंक्शनचे फोटो शेअर करत आहेत. लग्नानंतर ते हनिमूनला गेले होते. आता कॅटरिनाने तिच्या मेहंदीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चाहत्यांनी शोधले विकीचे नाव

कॅटरिनाने हा फोटो शेअर केल्यानंतर काही वेळेमध्येच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोवर चाहते आणि सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. अनेकांनी कॅटरिनाच्या हातावरील मेंहदीमध्ये विकीचे नाव शोधण्याचा देखील प्रयत्न केला आहे. कॅटरिनाने तिच्या मेहंदीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर टाकला आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. कॅटरिना कैफने मेहंदी आणि बांगड्यांचा फोटो शेअर करताना हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

राजस्थानमध्ये पार पडला लग्नसोहळा

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचे राजस्थानमध्ये 9 डिसेंबर रोजी लग्न झाले आहे. त्यानंतर ते एका हेलिकॉप्टरने हनीमूनला रवाना झाले. लग्नानंतर चार दिवसांनी ते मुंबईला परतले आणि विकी कौशल कॅटरिनाला त्याच्या अंधेरीच्या घरी घेऊन गेला होता.

ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, विकी आणि कॅटरिनाने एकत्र एक नवीन प्रोजेक्ट साइन केला आहे. हे जोडपे लवकरच एका जाहिरातीत एकत्र दिसणार आहे. विकी आणि कॅटरिना एका हेल्थ प्रोडक्टच्या शूटमध्ये एकत्र दिसणार आहेत आणि लवकरच त्याचे शूटिंग सुरू करणार आहेत.

संबंधित बातम्या : 

Entertainment : ‘हे’ चित्रपट आणि वेब सिरीज या आठवड्यात मोठा पडदा आणि OTTवर होणार प्रदर्शित

VIDEO : ‘जर्सी’साठी शाहिद कपूरनं गाळलं रक्त आणि घाम! टाके पडल्यानंतरही जोरदार फटकेबाजी!!