Malaika Arora | वजन कमी करण्यासाठी फिटनेस क्वीन मलायका अरोरा दररोज पिते ‘हे’ खास पेय

शोच्या माध्यमातून मलायका तिच्या पर्सनल लाईफबद्दल चाहत्यांना माहिती देखील देते.

Malaika Arora | वजन कमी करण्यासाठी फिटनेस क्वीन मलायका अरोरा दररोज पिते हे खास पेय
| Updated on: Jan 06, 2023 | 10:52 PM

मुंबई : मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. 49 वय मलायकाचे असूनही तिचा लूक अजूनही 24 वर्षांच्या मुलींसारखा दिसतो. मलायका तिचे अनेक बोल्ड लूकमधील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करते. मलायकाची स्कीन देखील कायमच ग्लो करते. मलायका तिच्या शोमुळे सध्या चर्चेत आहे. करण जोहर हा काही दिवसांपूर्वीच मलायकाच्या शोमध्ये सहभागी झाला होता. नोरा फतेही हिने देखील मलायकाच्या शोमध्ये हजेरी लावली होती. शोच्या माध्यमातून मलायका तिच्या पर्सनल लाईफबद्दल चाहत्यांना माहिती देखील देते.

अनेकांना मलायका अरोरा हिच्यासारखे फीट राहण्याची इच्छा आहे. कारण सध्याच्या जीवनशैलीमध्ये वाढलेले वजन ही अनेकांची समस्या आहे. विशेष: महिलांना वाढलेले वजन कमी करताना अनेक समस्या येतात.

घरातील कामे आणि नोकरी करत असताना महिलांचे वजन वाढते. परंतू अनेक महिलांना वाढलेले वजन कमी करण्यास धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अजिबात वेळ मिळत नाही. मलायका अरोरा कायमच जिमबाहेर स्पाॅट होते.

तुम्हाला जाणून आश्चर्य नक्कीच वाढले. परंतू वजन कमी करण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी मलायका अरोरा एक खास पेय दररोज घेते. मलायकाच्या फिटनेसचा राज हेच पेय असल्याचे सांगितले जाते.

मलायका वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी, अजवाईन आणि जिरे यांचे पेय दररोज सकाळी उपाशी पोटी घेते. हे सर्व अगोदर रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवते आणि सकाळी उकळून पिते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.