Raj Kundra Case | मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राविरोधात दाखल केले आरोपपत्र, शिल्पा शेट्टी होणार साक्षीदार, 1500 पानांत लेखाजोखा…

अश्लील चित्रपट बनवून ते अॅपद्वारे प्रसिद्ध केल्याबद्दल मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राविरोधात (Raj Kundra) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. 1500 पानांचे हे पुरवणी आरोपपत्र 5 सप्टेंबर, बुधवार रोजी एस्प्लेनेड न्यायालयात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि या प्रकरणातील इतर आरोपींच्या विरोधात सादर करण्यात आले आहे.

Raj Kundra Case | मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राविरोधात दाखल केले आरोपपत्र, शिल्पा शेट्टी होणार साक्षीदार, 1500 पानांत लेखाजोखा...
Raj-Shilpa
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 10:33 AM

मुंबई : अश्लील चित्रपट बनवून ते अॅपद्वारे प्रसिद्ध केल्याबद्दल मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राविरोधात (Raj Kundra) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. 1500 पानांचे हे पुरवणी आरोपपत्र 5 सप्टेंबर, बुधवार रोजी एस्प्लेनेड न्यायालयात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि या प्रकरणातील इतर आरोपींच्या विरोधात सादर करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणी राज कुन्द्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता साक्षीदार बनणार आहे.

आतापर्यंतचे अपडेट असे आहेत की, राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवण्यासाठी आणि ते अॅपमध्ये डाऊनलोड आणि रिलीज केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. तो 19 जुलै 2021 पासून तुरुंगात आहे. त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आता 16 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 8 सप्टेंबर रोजी राज कुंद्राच्या वकिलांनी पुढील तारखेला न्यायालयात अपील केले. न्यायालयाने त्यांचे अपील स्वीकारले आणि पुढील सुनावणीची तारीख 16 सप्टेंबर निश्चित केली.

राज कुंद्रावरील आरोप 1500 पानांमध्ये!

राज कुंद्राच्या अश्लील चित्रपट प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाच्या हाती असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने एक तपास पथक तयार केले होते. ACP स्तरीय अधिकारी या संघाचे नेतृत्व करत आहे. ही टीम त्याच्या तपासाशी संबंधित माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवत आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या 11 आरोपींविरोधात आतापर्यंत तपास सुरू आहे, त्याशिवाय या संपूर्ण प्रकरणात इतर कोणाचा सहभाग असल्याची माहिती नाही. तसेच, आता शिल्पा शेट्टी या प्रकारणात साक्षीदार होणार आहे.

ही बाब तेव्हा उघडकीस आली, जेव्हा मुंबई गुन्हे शाखेच्या टीमला मढ परिसरातील एका बंगल्यात वेब सीरीज बनवण्याच्या नावाखाली अश्लील चित्रपटांचे शूटिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी त्या बंगल्यावर छापा टाकला आणि शूटिंगच्या वेळीच कॅमेरामन, मॉडेल, ग्राफिक डिझायनर आणि डायरेक्टरला अटक केली. यानंतर पुढे दुवे उलगडले गेले आणि या प्रकरणाचा तपास राज कुंद्रापर्यंत पोहोचला. कुंद्रा आणि त्याचा प्रमुख साथीदार थोरपे यांना 19 जुलै रोजी अटक करण्यात आली.

कुंद्राला मिळत होता मोठा फायदा

पोलिस अधिकायांच्या म्हणण्यानुसार राज कुंद्रा यांनी ऑगस्ट 2019 मध्ये अश्लील चित्रपट बनवायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 100 पेक्षा अधिक अश्लील चित्रपट बनविले आहेत. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, या चित्रपटांच्या माध्यमातून कुंद्रा यांनी मोठी कमाई केली आहे. ती कमाई कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. कुंद्रा यांच्या अ‍ॅपसाठी सुमारे 20 लाख लोकांनी सदस्यता घेतली होती. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की, कुंद्रा यांना अश्लील चित्रपटांचे मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळत होते आणि नफ्यात चांगले पैसे ही मिळू लागले होते. वेबसाइटपेक्षा सहज उपलब्ध असल्याने कुंद्रा यांनी अश्लील चित्रपट अपलोड करण्यासाठी अॅप बनवले होते.

हेही वाचा :

Birthday Special : अभिनेत्री गौरी प्रधानचा 44 वा वाढदिवस, जाणून घ्या कसं जुळलं हितेन तेजवानीसोबत सूत

Lookalike | आपल्याप्रमाणे दिसणाऱ्या ‘या’ मुलीला पाहून प्रियांका चोप्रादेखील होईल आश्चर्यचकित, अभिनेत्रीचे प्रत्येक लूक करतेय कॉपी!