Naseeruddin Shah| तब्येतीत सुधारणा, नसीरुद्दीन शाहंना रुग्णालयातून डिस्चार्ज!

बॉलिवूडचे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) आपल्या बिनधास्त अभिनयासाठी ओळखला जातात. गेल्या काही दिवसांपासून नसीरुद्दीन शाह यांची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ‘हिंदुजा हॉस्पिटल’ मध्ये दाखल करण्यात आले होते.

Naseeruddin Shah| तब्येतीत सुधारणा, नसीरुद्दीन शाहंना रुग्णालयातून डिस्चार्ज!
नसीरुद्दीन शाह
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 10:31 AM

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) आपल्या बिनधास्त अभिनयासाठी ओळखला जातात. गेल्या काही दिवसांपासून नसीरुद्दीन शाह यांची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ‘हिंदुजा हॉस्पिटल’ मध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, अभिनेत्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे (Naseeruddin Shah recover get discharge from hospital).

नसीरुद्दीन शाह यांनी फुफ्फुसात न्यूमोनियाची लागण झाली होती. ज्यानंतर त्यांना 29 जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्या लाडक्या अभिनेत्याला लवकर बरे वाटावे म्हणून चाहते सतत प्रार्थना करत होते.

रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना बुधवारी सकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यांचा मुलगा विवान शाह याने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे नसीरुद्दीन यांच्या डिस्चार्जची माहिती दिली आहे.

विवानने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये नसीरुद्दीन यांची दोन छायाचित्रे शेअर केली आहेत, यातील एका फोटोमध्ये ते आपली पत्नी रत्ना पाठक शाहसोबत दिसले आहेत. दुसर्‍या छायाचित्रात अभिनेते एकटेच बसलेले दिसत आहेत, पण बाजूला असलेल्या आरशात रत्नाही दिसत आहे.

पहिली पोस्ट शेअर करताना विवानने “बॅक टू होम” लिहिले आहे, तर दुसर्‍या फोटोमध्ये लिहिले आहे की, “त्यांना आजच सकाळीच डिस्चार्ज मिळाला आहे”. अभिनेत्याचे हे दोन्ही फोटो त्याच्या बेडरूममधील असल्याचे दिसत आहे. आता नसीर घरी आले आहेत, तेव्हा त्यांचे चाहते याबद्दल खूप आनंदित झाले आहेत.

अभिनेत्याने स्वतः दिली हेल्थ अपडेट

यापूर्वी, स्पॉटबॉयशी बोलताना नसीरुद्दीन शहा यांनी सांगितले होते की, ते लवकरच रुग्णालयातून घरी जातील. 2 जुलै रोजी त्याला डिस्चार्ज मिळणार असल्याचे अभिनेत्याने म्हटले होते. नसीरुद्दीन यांनी स्वतः सांगितले होते की, आता ते पूर्णपणे ठीक आहे. त्याचवेळी त्यांचा मुलगा विवान यानेही असे म्हटले होते की, त्याचे वडील ठीक आहेत, काळजी करण्याची काहीच गरज नाही… ते अजूनही रुग्णालयात असून सर्व काही नियंत्रणात आहे.

नसीरुद्दीन शाहने आपल्या कारकीर्दीत बर्‍याच मोठ्या चित्रपटांत काम केले आहे. अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ते गेल्या वर्षी Amazon Prime Video प्रसिद्ध वेब सीरीज ‘बँडिश बॅन्डिट्स’मध्ये दिसले होते. या सीरीजमधील त्यांच्या भूमिकेला चाहत्यांनी खूप पसंती दिली होती.

(Naseeruddin Shah recover get discharge from hospital)

हेही वाचा :

Devmanus | देवीसिंगने घेतलीय अजित कुमार देवची जागा, आर्या-दिव्याला चकवत तुरुंगातून सुटणार की त्याचाच गेम होणार?

Dilip Kumar Funeral | लाडक्या अभिनेत्याच्या शेवटच्या दर्शनासाठी शेकडोंची गर्दी, दिलीप कुमारांच्या अंत्यसंस्कारला सुभाष घईंची उपस्थिती