Wedding Fees | लग्नात बॉलिवूड कलाकारांची हजेरी हवीय? जाणून घ्या कोणता कलाकार किती मानधन आकारतो…

अनेक बॉलिवूड स्टार्स लग्न आणि खाजगी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भरमसाठ फी आकारतात. जाणून घेऊया कोणत्या स्टारची आहे किती फी आहे ते....

Wedding Fees | लग्नात बॉलिवूड कलाकारांची हजेरी हवीय? जाणून घ्या कोणता कलाकार किती मानधन आकारतो...
Bollywood Celebs
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 8:00 AM

मुंबई : अलीकडेच अभिनेता सलमान खान (Salman khan) नेते प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजय पटेलच्या लग्नात पोहोचला होता. आता या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान देखील दिसत आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना चाहते प्रश्न विचारत आहेत की, सलमान या लग्नात कुठलेही नाते नसताना का नाचतोय? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अनेक बॉलिवूड स्टार्स लग्न आणि खाजगी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भरमसाठ फी आकारतात. जाणून घेऊया कोणत्या स्टारची आहे किती फी आहे ते….

कतरिना कैफ

कतरिना खरोखरच उत्तम डान्सर आहे. आणि ती खाजगी कार्यक्रम किंवा लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी तब्बल 3.5 कोटी रुपये घेते. बॉलिवूडमधील खासगी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी कतरिना सर्वाधिक फी घेते.

शाहरुख खान

शाहरुख खानला आपण अनेक कार्यक्रम आणि विवाहसोहळ्यांना हजेरी लावताना पाहिले आहे. एका कार्यक्रमासाठी तो 3 कोटी रुपयांपर्यंत शुल्क आकारतो.

अक्षय कुमार

बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त व्यक्ती असूनही, अक्षय कुमार खाजगी कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी वेळ काढतो. खाजगी कार्यक्रम किंवा लग्नासाठी तो सुमारे अडीच कोटी रुपये घेतो.

प्रियांका चोप्रा

आता ग्लोबल स्टार बनलेली प्रियांका प्रत्येक इव्हेंटसाठी सुमारे अडीच कोटी रुपये घेते. तिने अलीकडेच उदयपूर येथे ईशा अंबानीच्या लग्नालाही हजेरी लावली होती.

हृतिक रोशन

बॉलिवूडचा डान्सिंग किंग म्हटला जाणारा अभिनेता हृतिक रोशन कोणत्याही खाजगी कार्यक्रमात उपस्थिती लावण्यासाठी सुमारे 2.5 कोटी रुपये आकारतो.

रणबीर कपूर

फुटबॉल खेळणे, चित्रपट याशिवाय रणबीर विवाहसोहळे आणि खाजगी कार्यक्रमातूनही मोठी कमाई करतो. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, तो खाजगी कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी सुमारे 2 कोटी रुपये आकारतो.

सलमान खान

सलमानने आतापर्यंत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. त्याचे नाव एक ब्रँड आहे. खासगी कार्यक्रमांसाठी सलमान 2 कोटी रुपये घेतो.

रणवीर सिंह

रणवीर इतका उत्साही आहे की प्रत्येकजण त्याला आपल्या कार्यक्रमात आमंत्रित करू इच्छितो आणि जोशपूर्ण वातावरण तयार करू इच्छितो. रणवीर प्रायव्हेट इव्हेंट्समध्ये परफॉर्म करण्यासाठी 1 कोटी रुपये घेतो.

दीपिका पदुकोण

चित्रपटांव्यतिरिक्त दीपिका अनेक खासगी कार्यक्रमातूनही करोडो रुपये कमावते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री कोणत्याही खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुमारे 1 कोटी रुपये आकारते.

अनुष्का शर्मा

अनुष्का खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 80 लाख रुपये घेते. अनुष्का शर्मा ही खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वात कमी फी घेते.

हेही वाचा :

Happy Birthday Salman Khan | एका सुपरहिट चित्रपटानंतर तब्बल 6 महिने रिकामा बसून राहिला सलमान खान! वाचा नेमकं काय झालं?

Sunny Leone | ‘शाब्दिक’ वादानंतर सारेगामा बॅकफूटवर, अखेर सनी लिओनच्या ‘मधुबन’ गाण्यात बदल होणार!

ज्या वडिलांच्या उपचारासाठी स्पर्धेत सहभागी झाला, नियतीने त्यांनाच हिरावून नेलं! India’s Best Dancer फेम संकेतला पितृशोक