‘पंगा क्वीन’ कंगना रनौत नव्या अडचणीत, दिल्लीनंतर मुंबईतही अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल!

| Updated on: Nov 22, 2021 | 1:10 PM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि वाद यांचा अगदी जुना संबंध आहे. ती तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते, तर कधी स्वतःच्या वक्तव्यांमुळे ती अडचणीत येते. आता नुकतेच कंगनाच्या एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

‘पंगा क्वीन’ कंगना रनौत नव्या अडचणीत, दिल्लीनंतर मुंबईतही अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल!
मनजिंदर सिंह सिरसा आणि कंगना रनौत
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि वाद यांचा अगदी जुना संबंध आहे. ती तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते, तर कधी स्वतःच्या वक्तव्यांमुळे ती अडचणीत येते. आता नुकतेच कंगनाच्या एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. इतकंच नाही, तर या अभिनेत्रीचा खूप विरोध होत आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांना कंगनावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

मनजिंदर सिंग सिरसा ट्वीट करत म्हणाले की, आता कंगनाच्या विरोधात मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जाईल आणि त्याचवेळी ते या प्रकरणी महाराष्ट्र सचिवालयात गृहमंत्र्यांची भेट देखील घेणार आहेत.

पाहा ट्वीट :

त्यांनी ट्विट केले की, ‘आमचे शिष्टमंडळ आज सकाळी 11 वाजता मुंबई, खार पोलीस ठाण्यात अभिनेत्री कंगना रनौतच्या चुकीच्या जातीय टिप्पणीबद्दल तक्रार दाखल करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1.00 वाजता हे शिष्टमंडळ महाराष्ट्र सचिवालयात जाऊन माननीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे.

कंगनाला मेंटल हॉस्पिटल किंवा जेलमध्ये टाका!

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यापूर्वी सिरसा यांनी कंगनाबद्दल म्हटले होते की, सोशल मीडियावर तिच्या नकारात्मक कमेंट्सवर कठोर कारवाई व्हायला हवी. तिला नुकतीच मिळालेली सुरक्षा आणि पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा. तिच्या अशा कमेंट्स पाहून तिला मेंटल हॉस्पिटल किंवा जेलमध्ये टाकले जावे.

काय म्हणाली कंगना?

खरं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायद्याची तिन्ही विधेयके मागे घेतल्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर तिची प्रतिक्रिया दिली होती. कंगनाच्या मते, हे निर्णय मागे घेणे ही एक चूक आहे. त्यामुळेच तिने याप्रकरणी अनेक वादग्रस्त विधाने देखील केली.

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ‘खलिस्तानी दहशतवादी आज सरकारचे हात मुरगळत असतील, पण त्या महिला पंतप्रधानांना विसरू नका, ज्यांनी त्यांना पायाखाली चिरडले. त्यांनी देशाची फाळणी होऊ दिली नाही, तर त्यांना डासांप्रमाणे चिरडले. त्यांच्या मृत्यूच्या इतक्या वर्षानंतरही त्यांच्या नावाने हे लोक थरथर कापतात. या लोकांना अशा गुरुची गरज आहे.’

कंगनाने या पोस्टमध्ये थेट इंदिरा गांधींचे नाव घेतले नसले, तरी तिच्या बोलण्याचा रोख त्यांच्या दिशेनेच होता. आता सिरसा यांच्या या तक्रारीचा कंगनावर काय परिणाम होतो, हे येणारा काळच सांगू शकेल. याशिवाय या प्रकरणावर कंगनाची प्रतिक्रियाही येणे बाकी आहे.

हेही वाचा :

Marathi Movie | कौतुकास्पद पाऊल, देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित होणार मराठी चित्रपट ‘अजिंक्य’!

Hruta Durgule | लाखो दिलों की धडकन… ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळे पडलीये प्रेमात, कोण आहे ‘हा’ खास व्यक्ती?