राजू श्रीवास्तव यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू, अफवा पसरवणाऱ्यांचा दीपू श्रीवास्तव यांनी घेतला समाचार, व्हिडीओ शेअर करत म्हणाले की…

दिपू श्रीवास्तव यांनी व्हिडीओ तयार करत राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीची माहिती देखील दिलायं. तसेच राजू यांच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे देखील म्हटले आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यांच्यावर एम्सचे डॉक्टर अजूनही उपचार करत आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू, अफवा पसरवणाऱ्यांचा दीपू श्रीवास्तव यांनी घेतला समाचार, व्हिडीओ शेअर करत म्हणाले की...
| Edited By: | Updated on: Aug 20, 2022 | 8:36 AM

मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. देशभरातील चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करतांना दिसतायत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या बातमी सातत्याने सोशल मीडियावर (Social media) शेअर करण्यात येत असल्याने राजू श्रीवास्तव यांच्या छोट्या बंधुंनी संताप व्यक्त करत अशा चुकीच्या बातम्या पसरू नका. तसेच अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका अशी विनंती एक व्हिडीओ तयार करून केलीयं. आता राजू श्रीवास्तव यांच्या भावाचा हा व्हिडीओ (Video) सोशल मिडियावरती व्हायरल होतो आहे.

इथे पाहा राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दिपू श्रीवास्तव यांनी शेअर केलेला व्हिडीओ

दिपू श्रीवास्तव यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटले की…

दिपू श्रीवास्तव यांनी व्हिडीओ तयार करत राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीची माहिती देखील दिलायं. तसेच राजू यांच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे देखील म्हटले आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यांच्यावर एम्सचे डॉक्टर अजूनही उपचार करत आहेत. या सगळ्यामध्ये राजू यांचा भाऊ दीपू याने फेसबुकवर व्हिडिओ शेअर करून त्याच्या तब्येतीची माहिती दिली. दीपूने व्हिडिओ शेअर करून सांगितले की, राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरत आहे, मात्र ती फक्त आणि फक्त अफवाच आहेत.

लवकरच राजूच्या प्रकृतीबाबत चांगली बातमी येईल- शिखा श्रीवास्तव

व्हिडीओमध्ये दीपू श्रीवास्तव यांनी सांगितले की, लवकरच राजूच्या प्रकृतीबाबत चांगली बातमी येईल. याआधी राजूची पत्नी शिखा यांनी एका मीडिया मुलाखतीत सांगितले होते की, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते बरे होऊन लवकरच परत येतील. त्यांची पत्नी शिखा हिने राजू श्रीवास्तव यांच्या ब्रेन डेडची बातमी खोटी असल्याचे सांगितले होते. तसेच दीपू श्रीवास्तव यांनी आपल्या व्हिडीओमध्ये राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूच्या बातम्या पसरवणाऱ्या लोकांचा देखील चांगलाच समाचार घेतल्याचे दिसते आहे.