Ranveer Singh | अभिनेता रणवीर सिंह ‘या’ व्यक्तीला मानतो आयडॉल…

इतकेच नाही तर न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबईत रणवीरवर थेट गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वच स्तरातून रणवीरवर न्यूड फोटोशूटमुळे टीका झाली.

Ranveer Singh | अभिनेता रणवीर सिंह या व्यक्तीला मानतो आयडॉल...
| Updated on: Oct 13, 2022 | 8:33 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत होता. इतकेच नाही तर न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबईत रणवीरवर थेट गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वचस्तरातून रणवीरवर न्यूड फोटोशूटमुळे (Photoshoot) टीका झाली. मात्र, आता परत एकदा रणवीर चर्चेत आलाय. रणवीरने Lokmat Maharashtrian of the year 2022 award मध्ये बोलताना अत्यंत मोठे विधान केले आहे. कोणताही पुरस्कार (Award) असो तिथे फक्त चर्चा रणवीरच्या कपड्यांची होते. रणवीर हटके स्टाईलसाठी फेमस आहे.

लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात बोलताना रणवीर सिंहने त्याच्या आयुष्यातील आयडॉल असलेल्या व्यक्तीबद्दल सांगितले. विशेष म्हणजे रणवीरच्या आयुष्यातील आयडॉल व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बिग बी अर्थात आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते अमिताभ बच्चन आहेत. रणवीर यावेळी बोलताना म्हणाला की, मला अमिताभ बच्चन यांच्याकडून कायमच प्रेरणा मिळते आणि मला त्यांच्यासारखे व्हायचे आहे.

रणवीर सिंह म्हणाला की, मला आताही अमिताभ बच्चन यांच्यासारखे बनायचे आहे आणि पुढेही त्यांच्यासारखेच जगाचे आहे. वयाच्या 80 व्या वर्षी देखील ते अभिनय करण्यातच व्यस्त आहेत. मी खरोखरच अमिताभ बच्चन यांच्यावर खूप जास्त प्रभावित आहे आणि मला त्यांच्यासारखे बनण्याची प्रचंड इच्छा देखील आहे. रणवीर पुढे म्हणाला की, लहानपणापासूनच माझे प्रेरणास्थान बिग बीच आहेत. नुकताच अमिताभ बच्चन यांनी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी अमिताभ बच्चन हे मुंबईतच होते.