Filmfare Awards 2022 | रणवीर सिंहपासून ते पंकज त्रिपाठीपर्यंत या कलाकारांनी फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 गाजवले…

67 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या विजेत्यांबद्दल बोलायचे तर, रणवीर सिंहला त्याच्या 83 चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या मुख्य भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट भारतीय क्रिकेटर कपिल देव यांचा बायोपिक आहे. पुरस्कार स्वीकारताना रणवीर सिंह खूपच भावूक दिसला.

Filmfare Awards 2022 | रणवीर सिंहपासून ते पंकज त्रिपाठीपर्यंत या कलाकारांनी फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 गाजवले...
| Edited By: | Updated on: Aug 31, 2022 | 9:17 AM

मुंबई : फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 (Filmfare Awards 2022) ची आतुरता गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील कलाकारांसोबत चाहत्यांना देखील होती. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी दरवर्षी फिल्मफेअर अवॉर्ड्सचे (Awards) भव्य दिव्य आयोजन केले जाते. दरवेळेप्रमाणे यावेळीही सर्व स्टार्स या सेलिब्रेशनमध्ये तल्लीन झालेले दिसत आहेत. 67 व्या फिल्मफेअर पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर झाल्यानंतर मोठी चर्चा सुरू होती. या वर्षातील जवळपास प्रत्येक सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा (Movie) या यादीत समावेश होता, चला तर मग अव्वल ठरलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या विजेत्यांवर एक नजर टाकूया.

67 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या विजेत्यांबद्दल बोलायचे तर, रणवीर सिंहला त्याच्या 83 चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या मुख्य भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट भारतीय क्रिकेटर कपिल देव यांचा बायोपिक आहे. पुरस्कार स्वीकारताना रणवीर सिंह खूपच भावूक दिसला.

रणबीरशिवाय सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘शेरशाह’नेही फिल्मफेअरचा पुरस्कार मिळवला आहे. सिद्धार्थच्या जबरदस्त अभिनयासाठी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

क्रिती सेननला तिच्या मिमी चित्रपटासाठी पुरस्कार मिळालायं. या चित्रपटातील क्रितीच्या अभिनयाचे सर्वत्र मोठे काैतुकही झाले आहे.

दमदार अभिनयासाठी ओळख मिळवून देणारे पंकज त्रिपाठी यांना मिमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला.

अभिनेत्री सई ताम्हणकर हिलाही सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.