AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा ट्विस्ट ! सलमान खान टार्गेट होता? टायगरच्या हल्लेखोरांनी गॅलेक्सी अपार्टमेंटची केली होती रेकी…

टायगर श्रॉफवरील हल्ल्यात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. हल्लेखोरांनी टायगर नव्हे, तर सलमान खानला टार्गेट केल्याची कबुली दिली. त्यांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी केली होती. पोलिसांचा बंदोबस्त पाहून त्यांनी प्लान बदलला. बिश्नोई गँगचा संबंध असल्याचा संशय आहे, ज्यामुळे सलमानच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

मोठा ट्विस्ट ! सलमान खान टार्गेट होता? टायगरच्या हल्लेखोरांनी गॅलेक्सी अपार्टमेंटची केली होती रेकी...
salman khan Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 11:35 PM
Share

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचा टार्गेट टायगर नव्हे तर मोठा सेलिब्रिटी होता. तशी कबुलीच या हल्लेखोरांनी पोलिसांना दिली आहे. पण तो सेलिब्रिटी कोण होता? हे अद्याप उघड झालेलं नाही. त्याबाबतचे अनेक कयास लावले जात आहेत. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार या आरोपींनी सलमान खानच्या घराचीही रेकी केली होती. यावरून सलमान खान आरोपींच्या टार्गेटवर होता का? असा संशय व्यक्त केला जात आहे.

अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या या तिन्ही आरोपींनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी केली होती. पण सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचं लक्षात आल्यावर त्यांची हल्ला करण्याची हिंमत झाली नाही. या तिघांनी नंतर आपला प्लान बदलला. त्यांनी टायगरला टार्गेट करण्याचा निर्णय घेतला आणि टायगरवर हल्ला केल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बिश्नोई गँग सलमान खानच्या मागेच लागल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

टायगर बचावला

18 ऑक्टोबर रोजी जुहू येथे जमनालाल बजाज ग्राऊंडवर टायगर श्रॉफ फुटबॉल खेळायला आला होता. त्या ठिकाणी हे तिन्ही आरोपी दबा धरून बसले होते. टायगर श्रॉफ बाहेर पडताच त्यांनी टायगरच्या दिशेने बेछुठ गोळीबार केला. टायगरच्या दिशेने पाच राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. पण या हल्ल्यातून टायगर बचावला. टायगरच्या ड्राव्हरला एक गोळी लागल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एक स्थानिक व्यक्तीही या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. हे दोन्ही जखमी सुखरूप असल्याचं सांगितलं जात आहे.

टायगर श्रॉफ या हल्ल्यात थोडक्यात बचावला आहे. आरोपी टायगरवर गोळ्या झाडण्यासाठी समोर आला असता पिस्तुल जाम झाली. त्यातून गोळीच सुटत नव्हती. त्यामुळे टायगर थोडक्यात बचावला. टायगरला पळ काढण्यासाठी तेवढीच संधी मिळाली. एव्हाना गोळीबारामुळे नागरिकांमध्ये धावपळ उडाल्याने आरोपीही बिथरले आणि त्यांनी लगेच तिथून पळ काढला. आरोपी जुहूवरून थेट अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ आले. तिथे बाईक सोडून दिली आणि जयपूर मुंबई एक्सप्रेस पकडून दिल्लीला जायचा प्लान केला. दिल्लीवरून हे आरोपी नेपाळला पळून जाणार होते. पण राजस्थान पोलिसांनी मोठ्या शिताफिने त्यांना कोटा रेल्वे स्थानकात पकडलं. त्यामुळे आरोपींचा पळून जाण्याचा प्लान फसला.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!