कुणालाच जमलं नाही… झटक्यात 3600 कोटी रुपये कमावले, या डायरेक्टरची कमाल; फिल्म इंडस्ट्रीची उडाली झोप

एसएस राजामौली यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या अद्वितीय यशाचा गौरव. बाहुबली आणि RRR सारख्या केवळ तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांनी त्यांनी 3600 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी थक्क झाली. त्यांची भव्य निर्मिती, प्रभावी कथा आणि दूरदृष्टी यामुळे प्रादेशिक सिनेमाची ताकद जगाला दिसली, आणि ते एक अभ्यासाचा विषय बनले आहेत.

कुणालाच जमलं नाही... झटक्यात 3600 कोटी रुपये कमावले, या डायरेक्टरची कमाल; फिल्म इंडस्ट्रीची उडाली झोप
SS Rajamouli
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 10:26 AM

SS Rajamouli Birthday : फिल्मी दुनियेत जेव्हा जेव्हा मोठ्या दिग्दर्शकांची चर्चा होते, तेव्हा एसएस राजामौली यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. बाहुबलीस आरआरआर सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे देऊन राजामौली यांनी केवळ देशातच नव्हे तर जगात नावलौकीक मिळवला आहे. तसेच प्रादेशिक सिनेमा किती ताकदीचा असू शकतो हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्या सिनेमाची कहाणी, जोरदार व्हिज्युअल्स आणि मोठ्या स्तरावर होणारी शुटींग प्रेक्षकांना नेहमीच दिपवून टाकते. राजामौली यांनी गेल्या आठ वर्षात केवळ तीनच सिनेमे तयार केले. पण त्यांच्या या तीन सिनेमाने नुसती फिल्म इंडिस्ट्री हलवून सोडली नाही तर फिल्म इंडस्ट्रिची झोपच उडवलीय.

एसएस राजामौली यांच्या बाहुबली या सिनेमाने रेकॉर्डतोड कमाई केली होती. आज राजामौली यांचा वाढदिवस आहे. त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अवघे तीन सिनेमे बनवले. पण या तीन सिनेमाने झटक्यात 3600 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे राजामौली हे चर्चेचाच नव्हे तर अभ्यासाचा विषय ठरले आहेत. त्यांच्या कोणत्या सिनेमाने किती कमाई केली त्यावर टाकलेला हा प्रकाशझोत.

Loading...

1. बाहुबली: द बिगिनिंग

एसएस राजामौली यांची ‘बाहुबली: द बिगिनिंग’ हा सिनेमा 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बजेटचे सर्व रेकॉर्ड तोडले. तसेच भारतीय सिनेमा निर्मात्यांची बजेट बाबतची जी मानसिकता होती, तिलाही त्यांनी छेद दिला. प्रभासने या सिनेमात बाहुबलीची भूमिका साकारली होती. तर राणा दुग्गुबाती भल्लालदेवच्या भूमिकेत दिसले होते. अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया आणि राम्या कृष्णन यांचीही या सिनेमात दमदार भूमिका होती. या सिनेमाने जगभरात 650 रुपये कमावले होते.

2. बाहुबली 2: द कन्क्लूजन

2017 मध्ये ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया आणि राम्या कृष्णन सारखे तगडे कलाकार या सिनेमात होते. या सिनेमाने प्रेक्षकांना महिष्मतीच्या साम्राज्याशी जोडलं. कटप्पाने बाहुबलीला का मारलं? हा या सिनेमातील सर्वात मोठा सवाल होता. या प्रश्नामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला ताणली गेली होती. जोरदार अॅक्शन, जबरदस्त कहाणी आणि भव्य सेट यामुळे या सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवले. या सिनेमाने जगभरात 1788 कोटींचा धंदा केला.

3. आरआरआर (RRR)

एसएस राजामौलींचा ‘आरआरआर’ हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमात राम चरण आणि ज्यूनियर एनटीआर मुख्य भूमिकेत होते. तर आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनीही या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. दोन क्रांतीकारकांपासून प्रेरणा घेऊन हा सिनेमा तयार करण्यात आला होता. या सिनेमाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झालं. सिनेमाने जगभरात 1230 कोटी रुपये कमावले.

4. ‘वाराणसी’ वर नजरा

आता एसएस राजामौली यांचा ‘वाराणसी’ हा सिनेमा येत आहे. या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमात महेश बाबू, प्रियंका चोपड़ा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा 7 एप्रिल 2027 रोजी प्रदर्शित करण्याची योजना आहे. राजमौली यांचा मुलगा कार्तिकेय या मोठ्या प्रोजेक्टवर निर्माता म्हणून काम करत आहे. त्यामुळे या सिनेमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us