दबंग सलमानसोबत डायरेक्टरचे कडाक्याचे भांडण, त्या धक्कादायक घटनेची माहिती समोर; घडलं असं की…

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान रागीट स्वभाव आणि वादामुळे चर्चेत राहिला. त्याच्या वादांचे किस्से आजही बॉलिवूडमध्ये चर्चिले जातात. असाच एक किस्सा बॉलिवूडचे शो मॅन म्हणून ओळख असलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी सांगितला आहे.

दबंग सलमानसोबत डायरेक्टरचे कडाक्याचे भांडण, त्या धक्कादायक घटनेची माहिती समोर; घडलं असं की...
दबंग सलमानसोबत डायरेक्टरचे कडाक्याचे भांडण, त्या धक्कादायक घटनेची माहिती समोर; घडलं असं की...
Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Aug 29, 2026 | 7:25 PM

सलमान खान आणि वाद हे काय आता नवीन राहिलेलं नाही. बॉलिवूडचा दबंग स्टार त्याच्या आक्रमक स्वभावामुळे कायम चर्चेत राहिला आहे. रूपेरी पडद्यामागे घडलेल्या बऱ्याच वादातही त्याचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे सलमान खान आणि वाद हे समीकरण ठरलं आहे. असाच एका जुन्या वादाचा उलगडा प्रसिद्ध दिग्दर्शन आणि शो मॅन म्हणून ओळख असलेल्या सुभाष घई यांनी केला आहे. दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासोबत युवराज चित्रपटात सलमान अभिनेता म्हणून होता. हा चित्रपट 21 नोव्हेंबर 2008 रोजी रिलीज झाला होता. पण हा चित्रपट रूपरी पडद्यावर येण्यापूर्वी एक मोठा किस्सा घडला होता. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सुभाष घई आणि सलमान खान यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं होतं. त्यानंतर सलमान खानचे वडील सलीम खान यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण सोडवलं. युवराज चित्रपटात सलमानखानसोबत अनिल कपूर, कतरिना कैफ यांनीही या चित्रपटात भूमिका बजवल्या होत्या. पण रुपेरी पडद्यावर हा चित्रपट चांगली कमाई करू शकला नाही.

सुभाष घई यांनी या भांडणापूर्वी काय झालं ते सांगितलं?

टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सुभाष घई यांनी सांगितलं की, ‘युवराज चित्रपटासाठी सलमान खानचा भाऊ माझ्याकडे आला होता आणि विचारलं की तुम्ही सलमान खानसोबत चित्रपट का करत नाहीत? मी त्याला विचारलं की सलमान खानला असं वाटतं का? कारण मी त्याच्यासोबत यापूर्वी कधीच काम केलं नव्हतं. तेव्हा त्याने सांगितलं की, सलमान तयार आहे. त्यानंतर मी एक कथा लिहिली. माझा प्रयत्न असा होता की कोणत्याही अभिनेत्याला अशी भूमिका द्यायची की त्याने यापूर्वी कधीच साकारली नाही. ‘

दोघांमध्ये कडाक्याचं भांडण

सुभाष घई यांनी वादाबाबत सांगितलं की, ‘चित्रपटाच्या चित्रिकरणापूर्वी आमच्या कडाक्याचं भांडण झालं. आम्ही एका पार्टीत होतो. सलमान हाई होता आणि काहीही बोलत होता. त्यामुळे त्या मी तसं बोलण्यापासून रोखलं. त्याने माझ्याकडे काही तक्रारी केल्या. मला विचारू लागला की तुम्ही असं का केलं तसं का केलं. मी त्याला सांगितलं की दिग्दर्शक म्हणून तो माझा निर्णय आहे. त्यानंतर मला शिव्या देऊ लागला. मी त्याला तसं बोलण्यास रोखलं. त्यानंतर हाणामारीवर उतरला आणि आमचं कडाक्याचं भांडणं झालं.’

सुभाष घई यांनी पुढे सांगितलं की, ‘दुसऱ्या दिवशी सकाळी सलीम यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सलमानने आईला घडलेला प्रकार सांगितला आहे. मी त्याला खूप ओरडलो आहे. त्यानंतर सलमानला माझ्या घरी माफी मागण्यासाठी पाठवलं. सलमान आला आणि नम्रपणे माझी माफी मागितली. त्याचं असं वागणं पाहून प्रभावित झालो. वडिलांचा किती आदर करतो हे मी पाहिलं. मी हा वाद तिथेच संपवला. आम्ही एकमेकांच्या घरी जाऊ लागलो आणि एकत्र चित्रपटही केला.’

Follow Us