AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kashmir Files कोरोनानंतरचा ब्लॉकबस्टर चित्रपट; रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ला ही कमाईत टाकलं मागे

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित द काश्मीर फाईल्सची (The Kashmir Files) कमाई दुसऱ्या आठवड्यात हळूहळू कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी 13 दिवसांत या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. बुधवारी (23 मार्च) या चित्रपटाने 10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

The Kashmir Files कोरोनानंतरचा ब्लॉकबस्टर चित्रपट; रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'ला ही कमाईत टाकलं मागे
The Kashmir Files and SooryavanshiImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 24, 2022 | 12:46 PM
Share

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित द काश्मीर फाईल्सची (The Kashmir Files) कमाई दुसऱ्या आठवड्यात हळूहळू कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी 13 दिवसांत या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. बुधवारी (23 मार्च) या चित्रपटाने 10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कोरोना महामारीनंतरचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) या चित्रपटाच्या एकूण कमाईलाही द काश्मीर फाईल्सने मागे टाकलं आहे. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची मन हेलावणारी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. देशातील काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री घोषित करण्यात आला. विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, पुनीत इस्सार, चिन्मय मांडलेकर यांच्यासह इतरही नामांकित कलाकारांच्या भूमिका आहेत.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने या चित्रपटाच्या कमाईचा आकडा ट्विटरवर पोस्ट केला आहे. 13 दिवसांत या चित्रपटाने 200.13 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचा फटका अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटालाही बसला. बच्चन पांडेने पाच दिवसांत जवळपास 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ने देशभरात चर्चा घडवून आणली आहे. लोकसभा, राज्यसभेतही या चित्रपटाचा विषय गाजला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आणि देशभर त्याच गोष्टीवरून सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या.

दुसऱ्या आठवड्याची कमाई-

शुक्रवार- 19.15 कोटी रुपये शनिवार- 24.80 कोटी रुपये रविवार- 26.20 कोटी रुपये सोमवार- 12.40 कोटी रुपये मंगळवार- 10.25 कोटी रुपये बुधवार- 10.03 कोटी रुपये एकूण- 200.13 कोटी रुपये

कथा काल्पनिक असल्याच्या आरोपांवर पल्लवी जोशींचं उत्तर

1990 मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर जो अत्याचार झाला, तोच पडद्यावर मांडल्याचा दावा अग्निहोत्री करत आहेत. मात्र यावर अद्यापही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या चित्रपटात प्रोफेसरची भूमिका साकारलेली अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिलं आहे. विवेकने या चित्रपटाच्या संशोधनासाठी अनेक वर्षे मेहनत केली असून त्यांच्याकडे 4000 तासांचे रिसर्च व्हिडीओज असल्याचं पल्लवी यांनी म्हटलंय.

हेही वाचा:

‘ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्य होतील, तिथे तिथे..’; The Kashmir Files बद्दल शरद पोंक्षेंचं रोखठोक मत

The Kashmir Filesची कमाई काश्मिरी पंडितांना देण्याचा सल्ला देणाऱ्या IAS अधिकाऱ्याला विवेक अग्निहोत्रींचं उत्तर..

Follow Us
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन