‘ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्य होतील, तिथे तिथे..’; The Kashmir Files बद्दल शरद पोंक्षेंचं रोखठोक मत

'द काश्मीर फाईल्स'मध्ये (The Kashmir Files) दाखवण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांच्या अत्याचारावर सोशल मीडियावरून सामाजिक आणि राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. फक्त सर्वसामान्यच नाही तर कलाकारसुद्धा यावर व्यक्त होत आहेत.

'ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्य होतील, तिथे तिथे..'; The Kashmir Files बद्दल शरद पोंक्षेंचं रोखठोक मत
Sharad Ponkshe on The Kashmir FilesImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 1:08 PM

‘द काश्मीर फाईल्स’मध्ये (The Kashmir Files) दाखवण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांच्या अत्याचारावर सोशल मीडियावरून सामाजिक आणि राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. फक्त सर्वसामान्यच नाही तर कलाकारसुद्धा यावर व्यक्त होत आहेत. ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी या चित्रपटाच्या विषयावरून एक पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ‘ज्या ज्या भागांत हिंदू अल्पसंख्य होतील, तिथे तिथे काश्मीर फाईल्स तयार होईल. हे लक्षात ठेवा,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. काही तासांपूर्वी केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या कमेंट्समध्येही दोन गट पडले आहेत. काहींनी शरद पोंक्षेंच्या या पोस्टचं समर्थन केलंय, तर काहींनी ही पोस्ट अजिबात पटली नसल्याचं मत मांडलंय. (Vivek Agnihotri Film)

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

‘ही जी तुम्ही शक्यता वर्तवत आहात यात काही जगावेगळं तुम्ही सांगत नाही आहात. जिथे हिंदू अल्पसंख्याक होतील तिथे काश्मीर फाईल्स तयार होईल म्हणे. मग जिथे जिथे हिंदू बहुसंख्यांक आहेत आणि इतर जाती समूह अल्पसंख्याक आहेत, त्यांचं काय? मग अशा किती फाईल्स घडल्या आहेत याचा हिशोब करत बसायचा का त्यांनी,’ असा सवाल एकाने केला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा हिंदू-मुस्लिम वादावर हिंदूंची बाजू मांडणारा किंवा मुस्लिमांच्या विरोधात बोलणारा नाहीये. तो फुटीरतावादी, दहशतवादी विरुद्ध हिंदू असा आहे. त्यामुळे या फिल्मच्या बाजूच्या आणि विरोधातल्या दोन्ही लोकांनी त्याची अशी मांडणी करू नका, असं दुसऱ्याने लिहिलं आहे.

शरद पोंक्षेंची फेसबुक पोस्ट-

द काश्मीर फाईल्सची कथा काल्पनिक आहे असं म्हणणाऱ्यांना पल्लवी जोशींचं उत्तर-

1990 मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर जो अत्याचार झाला, तोच पडद्यावर मांडल्याचा दावा अग्निहोत्री करत आहेत. मात्र यावर अद्यापही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या चित्रपटात प्रोफेसरची भूमिका साकारलेली अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी यांनी या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिलं आहे. विवेकने या चित्रपटाच्या संशोधनासाठी अनेक वर्षे मेहनत केली असून त्यांच्याकडे 4000 तासांचे रिसर्च व्हिडीओज असल्याचं पल्लवी यांनी म्हटलं.

हेही वाचा:

“The Kashmir Files साठी लता मंगेशकरांनी…”; अखेर विवेक अग्निहोत्रींनी चर्चांना दिला पूर्णविराम

The Kashmir Filesची कमाई काश्मिरी पंडितांना देण्याचा सल्ला देणाऱ्या IAS अधिकाऱ्याला विवेक अग्निहोत्रींचं उत्तर..

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.