“विवेक अग्निहोत्रींना राज्यसभेत पाठवा, नाहीतर ते…”; The Kashmir Files वर काश्मिरी नेत्याचं मोठं विधान

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटावरून वादंग उठलंय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आणि देशभर त्याच गोष्टीवरून सामाजिक आणि राजकीय मतभेदाचा वणवा पेटला. हा चित्रपट आणि दिग्दर्शिक विवेक अग्निहोत्री यांच्याविषयी आता एका काश्मिरी नेत्याने मोठं विधान केलं आहे.

विवेक अग्निहोत्रींना राज्यसभेत पाठवा, नाहीतर ते...; The Kashmir Files वर काश्मिरी नेत्याचं मोठं विधान
Sajad Lone on The Kashmir FilesImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 10:53 AM

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटावरून वादंग उठलंय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आणि देशभर त्याच गोष्टीवरून सामाजिक आणि राजकीय मतभेदाचा वणवा पेटला. हा चित्रपट आणि दिग्दर्शिक विवेक अग्निहोत्री यांच्याविषयी आता एका काश्मिरी नेत्याने मोठं विधान केलं आहे. जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन (Sajad Lone) यांनी अग्निहोत्रींवर जोरदार टीका केली आहे. अग्निहोत्रींना राज्यसभेचे खासदार बनवा, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. त्याचसोबत द काश्मीर फाईल्सची कथा ही काल्पनिक आहे, असंही त्यांनी म्हटलंय. अशा चित्रपटांचे दिग्दर्शक हे देशात द्वेष पसरवतील, अशा शब्दांत त्यांनी विवेक अग्निहोत्रींवर निशाणा साधला आहे.

“विवेक अग्निहोत्री, अनुपम खेर यांना राज्यसभेत पाठवावं”

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की त्यांनी विवेक अग्निहोत्रींना राज्यसभेचं खासदार बनवावं. अन्यथा ते अजून काय करतील याचा नेम नाही. सध्या एक नवा ट्रेंड आला आहे की, विवेक अग्निहोत्री आणि अनुपम खेर यांच्यासारखे लोक राज्यसभेत जाण्यासाठी आतूर आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवावं. नाहीतर ते देशात द्वेष पसरवण्याचं काम करत राहतील”, असं सज्जाद लोन म्हणाले.

“पंडितांपेक्षा 50 पटीने अधिक काश्मिरी मुस्लिमांनी सहन केलंय”

काश्मिरी पंडितांसोबतच काश्मिरी मुस्लिमांवरही अत्याचार झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. “काश्मिरी पंडितांवर अन्याय झाला, यात काहीच शंका नाही. पण पंडितांपेक्षा 50 पटीने अधिक काश्मिरी मुस्लिमांनी सहन केलंय. तुम्ही फक्त एकाच समुदायाचं दु:ख दाखवू शकत नाही. मी स्वत: माझ्या वडिलांना गमावलंय”, असं ते पुढे म्हणाले. काश्मीरमधल्या अनंतनाग इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कथा काल्पनिक असल्याच्या आरोपांवर पल्लवी जोशींचं उत्तर

1990 मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर जो अत्याचार झाला, तोच पडद्यावर मांडल्याचा दावा अग्निहोत्री करत आहेत. मात्र यावर अद्यापही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या चित्रपटात प्रोफेसरची भूमिका साकारलेली अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिलं आहे. विवेकने या चित्रपटाच्या संशोधनासाठी अनेक वर्षे मेहनत केली असून त्यांच्याकडे 4000 तासांचे रिसर्च व्हिडीओज असल्याचं पल्लवी यांनी म्हटलंय.

हेही वाचा:

‘ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्य होतील, तिथे तिथे..’; The Kashmir Files बद्दल शरद पोंक्षेंचं रोखठोक मत

The Kashmir Filesची कमाई काश्मिरी पंडितांना देण्याचा सल्ला देणाऱ्या IAS अधिकाऱ्याला विवेक अग्निहोत्रींचं उत्तर..

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.