Akshay Kumar | अक्षय कुमार याच्या चित्रपटाच्या मेकअप मॅनवर थेट बिबट्याने केला हल्ला, वाचा काय घडले?

अक्षय कुमार हा बाॅलिवूडमधील असा एकमेव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला तब्बल चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अनेकदा यावरून अक्षय कुमार याला टार्गेट देखील केले जाते.

Akshay Kumar | अक्षय कुमार याच्या चित्रपटाच्या मेकअप मॅनवर थेट बिबट्याने केला हल्ला, वाचा काय घडले?
Akshay Kumar
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 18, 2023 | 4:35 PM

मुंबई : बाॅलिवूडचा खिलाडी कुमार हा गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार (Akshay Kumar) याचे चित्रपट एका मागून एक असे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. रक्षाबंधन हा देखील अक्षय कुमारचा चित्रपट फ्लाॅप गेलाय. काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अक्षय कुमार हा कपिल शर्माच्या शोमध्ये आला होता, त्यावेळी अक्षय कुमार हा म्हणाला की, कपिल शर्मा याची नजर लागल्यामुळेच माझे चित्रपट फ्लाॅप जात आहेत. मात्र, अक्षय कुमार हा मजाकमध्ये बोलला होता. मुळात म्हणजे कोरोनानंतरच बाॅलिवूडचे चित्रपट (Movie) बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. फक्त अक्षय कुमार हाच नाही तर आमिर खान याचा देखील चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेलाय. २४ तारखेला अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अक्षय कुमार हा थेट मुंबईच्या मेट्रोमध्ये पोहचला होता. यावेळी त्याने इम्रान हाश्मी याच्यासोबत मेट्रोमध्ये डान्स देखील केला.

अक्षय कुमार हा बाॅलिवूडमधील असा एकमेव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला तब्बल चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अनेकदा यावरून अक्षय कुमार याला टार्गेट देखील केले जाते. सेल्फी चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच अक्षय कुमार याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केलीये.

अक्षय कुमार हा सध्या त्याच्या आगामी छोटे मियाँ बडे मियाँ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमार याच्यासोबत या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ हा देखील मुख्य भूमिकेत आहे. टायगर श्रॉफ याने या चित्रपटातील भूमिकेसाठी बाॅडीवर खूप जास्त काम केले आहे. टायगर श्रॉफ याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

नुकताच अक्षय कुमार याच्या सेटजवळ अशी एक घटना घडली आहे की, ती ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसेल. छोटे मियाँ बडे मियाँ या चित्रपटातील अक्षय कुमारच्या मेकअप मॅनवर एका बिबट्याने हल्ला केला आहे. मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या श्रावण विश्वकर्मा यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.

श्रावण त्याच्या बाईकवर होता आणि त्याच्या मित्राला चित्रपटाच्या सेटवर सोडण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याची बाईक बिबट्याला धडकली आणि त्यानंतर तो बेशुद्ध झाला. यानंतर मेकअप आर्टिस्ट बेशुद्ध झाला. पुढे काय झाले हे त्याला काहीच आठवत नाहीये. लोकांनी त्याला दवाखान्यात दाखल केले.

धक्कादायक बाब म्हणजे जिथे ही घटना घडली. तिथून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर छोटे मियाँ बडे मियाँचा सेट असून अक्षय कुमार याचे शूटिंग सुरू होते. प्रॉडक्शन हाऊसवाले श्रावण विश्वकर्मा याच्या उपचाराचा खर्च देत आहेत. यावेळी श्रावण विश्वकर्मा यांनी घडलेली संपूर्ण घटना देखील सांगितली.