टायगर श्रॉफ याला लागले पिस्तुलाच्या गोळ्यांचे छर्रे, टीमने शेअर केला शॉकिंग video
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर हल्ला झाल्यानंतर आतापर्यंत १० लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत जखमी उमेश चौहान यांचे केईएममध्ये ऑपरेशन करण्यात येऊन त्यांची गोळी काढण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या बीएमडब्ल्यू कारवर गोळीबार झाल्यानंतर तो चर्चेत आहे. रविवारी रात्री अभिनेता टायगरवर जुहू येथे कारमध्ये बसला असताना दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत टायगर कसा तरी बचावला पण त्याचा ड्रायव्हर आणि दूसरा एक उमेश चौहान नावाचा व्यक्ती जखमी झाले. या हल्ल्यात टायगर श्रॉफ याने आपल्या ड्रायव्हरला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी टायगरचा एक हाताला बँडेज लावलेला फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर टायगरला नेमके कशा काय जखमा झाल्या असा सवाल केला जात होता. आता टायगर टीमने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून टायगरच्या हाताला किती जखमा झाल्या आहेत याची प्रचिती येते.
अभिनेता टायगरच्या हाताला बँडेज लावण्यात आले होते. ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा उडालेल्या गोळीचे छर्रे उडाल्याने त्याचा हात संपूर्ण या जखमांनी भरला होता. या व्हिडीओत टायगर आपले बायसेप्स देखील फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या व्हिडीओ टायगरच्या हाताला किती जखमा झाल्या आहेत ते दिसत आहेत. वास्तविक, टायगरचा हात गोळीबार झाला तेव्हा उडाल्याने छऱ्यांनी जखमी झाला होता. या व्हिडीओ शेअर करताना टीम टायगरे लिहिलंय की, god is kind ( देव दयाळू आहे )
येथे व्हिडीओ पाहा –
बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी
टायगर श्रॉफ याच्या वरील हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. अनिल पंडित यांनी पोस्ट करत लिहिलेय की आज जे टायगर श्रॉफचे काम झाले त्याची जबाबदारी मी आणि हरमन संधू घेत आहोत.याला आम्ही कॉल करुन समजावले होते. या समजले नाही. जो कोणी फिल्म इंडस्ट्रीज आमचे ऐकणार नाही. सलमान खान याच्या सोबत काम करेल पुढचा नंबर त्याचा असेल. वाट पाहा…
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर जुहूत गोळीबार झाल्यानंतर आतापर्यंत १० जणांना पोलिसांनी विविध ठिकाणांवरुन अटक केली आहे. १८ ऑक्टोबर रोजी टायगरच्या कारवर हा गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणातील तिघा हल्लेखोरांना १५ तासांच्या आत पोलिसांनी राजस्थान येथील कोटा येथून अटक केली होती.