उर्वशी रौतेलाच्या मानेवर ‘लव्ह बाइट’? त्यावर ती म्हणाली..

| Updated on: Feb 25, 2022 | 7:44 AM

उर्वशीचे (Urvashi Rautela) स्टायलिश लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये तिच्या मानेवर लाल रंगाचा डाग नेटकऱ्यांनी पाहिला आणि त्यावरून त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

उर्वशी रौतेलाच्या मानेवर लव्ह बाइट? त्यावर ती म्हणाली..
Urvashi Rautela
Follow us on

सोशल मीडियावर कोणत्याही अफवा पसरायला वेळ लागत नाही. अनेकदा या अफवांचा फटका सेलिब्रिटींना बसतो. ट्रोलिंगमुळे त्यांना नकारात्मक कमेंट्सचा सामना करायला लागतो. असंच काहीचं अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत (Urvashi Rautela) घडलं आहे. उर्वशी अनेकदा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करते. मात्र यावेळी तिने टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याचप्रमाणे तिच्याविषयी अफवा पसवणाऱ्यांना माफी मागण्यास सांगितलं आहे. उर्वशीचे एअरपोर्ट लूक (Airport Look) नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच तिचे एअरपोर्टवरील स्टायलिश लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये उर्वशीच्या मानेवर लाल रंगाचा डाग नेटकऱ्यांनी पाहिला आणि त्यावरून त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. उर्वशीच्या मानेवर ‘लव्ह बाईट’ असल्याची अफवा सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरली. (Urvashi Rautela on love bite)

सोशल मीडियावर पसरलेली ही अफवा पाहून उर्वशीचा राग अनावर झाला. ट्विटरच्या माध्यमातून तिने संबंधित वृत्त देणाऱ्यांना खडसावलं. ‘काय मूर्खपणा आहे हा? मास्कमुळे माझ्या लिपस्टिकचा लाल रंग पसरला आणि मानेवर तो तसाच राहिला. कोणत्याही मुलीला विचारा, की लाल रंगाची लिपस्टिक वापरणं किती कठीण असतं. एखाद्या व्यक्तीची विशेषकरून मुलीची प्रतिमा मलिन करण्यासाठी ते काहीही लिहू शकतात. खोटी वृत्तं लिहिण्यापेक्षा तुम्ही माझ्या यशाबद्दलच्या बातम्या का नाही लिहित’, असा सवाल उर्वशीने केला.

उर्वशीने तिचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. ९ फेब्रुवारी रोजी या व्हिडीओला शेअर करत उर्वशीने तिच्या चाहत्यांना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या व्हिडीओमध्ये तिने लाल रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला होता. उर्वशी नेहमी तिच्या हटके स्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या एका ड्रेसची किंमत लाखो रुपयांमध्ये असते. उर्वशी लवकरच एका मोठ्या बजेटच्या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट तमिळ भाषेत असल्याचं समजलं जात आहे.