Urvashi Rautela | अभिनेत्रीच्या लूकनं चाहते घायाळ; उर्वशी रौतेलाच्या ड्रेसची जाणून घ्या किंमत!

Urvashi Rautela | अभिनेत्रीच्या लूकनं चाहते घायाळ; उर्वशी रौतेलाच्या ड्रेसची जाणून घ्या किंमत!
उर्वशी रौतेला

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अभिनेत्रीची झलक पाहण्यासाठी चाहते वाट पाहत असतात. नुकतीच उर्वशी लाखो रुपयांच्या ड्रेसमध्ये दिसली. या लूकने तिचे चाहते घायाळ झाले...

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 28, 2021 | 1:16 PM

उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील दिलखेचक अभिनेत्री आहे. उर्वशी आपल्या स्टाईल आणि फॅशननं प्रत्येकाला दिवाना करून सोडते. उर्वशी नेहमी हटके ड्रेससाठी ओळखली जाते. तिच्या एका ड्रेसची किंमत लाखो रुपये असते. नुकताच उर्वशीनं एक ड्रेस खरेदी केला. या ड्रेसची किंमत खूप महाग आहे.

 

उर्वशीचे 44.1 मिलीयन फॉलोअर्स

उर्वशीचे 44.1 मिलीयन फॉलोअर्स आहेत. उर्वशीनं मेहनत आणि समर्पन भावनेनं हे यश संपादन केलंय. बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही तीनं आपल्या यशाचा मार्ग प्रशस्त केलाय. उर्वशी सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय राहते. आपल्या चाहत्यांना आकर्षित करणारे फोटो आणि डान्ससाठी ती ओळखली जाते.

 

मिस युनिवर्स आहे उर्वशी

उर्वशीनं मिस युनिवर्सला जज करण्यासाठी इस्त्राईलचा दौरा केला. येथे तीनं भारताचं प्रतिनिधीत्व केलं. याशिवाय ती एक प्रतिभाशाली फॅशनिस्ट आहे. ज्याप्रमाणे ती आकर्षक ड्रेस वापरते तसंच ती आपल्या चाहत्यांना प्रेरणा देतो. अभिनेत्रीचे आंतरराष्ट्रीय डिझाईन नेहमी आपलं लक्ष वेधून घेतात.

 

तीन लाखांचा उर्वशीचा ड्रेस

नुकतीच उर्वशीनं आपल्या सोशल मीडियावर काही फोटो अपलोड केलेत. त्यात ती आंतरराष्ट्रीय डिझायनर अभिनेत्री अलेक्जेंड्रे वाऊथीयरकडून तयार केलेले एक गोल्डन शिमर ड्रेस वापरलेली आहे. उर्वशीच्या साध्या दिसणाऱ्या या ड्रेसची किंमत तीन लाख रुपये आहे. त्यामध्ये एका बेल्टसह विशिष्ट पॅटर्न आहे.

 

डोळ्यांनी वेधले लक्ष

उर्वशीनं आपला लूक पूर्ण करण्यासाठी बेबी पिंक पॅटर्नचा वापर केला. अभिनेत्रीनं आपल्या कातील डोळ्यांनी सर्वांचं मन जिंकलं. कारण तिच्या डोळ्यात काजळासह ग्लेम जोडन्यासाठी डार्क आय शॉडोचं मिश्रण होतं.
लिप ग्लास लिपस्टीकसह ब्लश आणि कॉन्टोरसह ग्लॅमर टच जोडला होता. एक्सेसरीजची गोष्ट करायची तर ही अभिनेत्री गोल्डन आणि डायमंड फिंगर रिंग्ससह बीडेड इअर रिंग्स निवडले होते. जे सर्वात खास होते.

 

उर्वशीचं काम

उर्वशी रौतेला एका मोठ्या बजेटच्या विज्ञानावर आधारित तामिळ चित्रपटात आपले डेब्यू करणार आहे. त्यामध्ये ती मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एक आयआयटीएनची भूमिका साकार करणार आहे. त्यानंतर ती द्विभाषी थ्रिलरमध्ये दिसणार आहे. ब्लॅक रोज शिवाय उर्वशीनं थीरुतू पायल दोनच्या हिंदी रिमेकच्या नावाची घोषणा केली. उर्वशी रणदीप हुड्डासह वेब सिरीज इन्स्पेक्टर अविनाशमध्ये अभिनय करत आहे. ही वेब सिरीज अविनाश मिश्रा यांच्या कहानीवर आधारित एक बायोपीक आहे.

Health | व्हिटॅमीन डीची कमी सहज घेऊ नका, रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आजार होऊ शकतात; कशी घ्याल काळजी?

त्वचेवर ग्लो हवा आहे? मग हे 5 प्रकारचे टोनर वापरा, जाणून घ्या याबद्दल अधिक!

 

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें