AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच की काय? इशान किशनचं लग्न ठरलं! कोणासोबत घेणार सात फेरे?

भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवल्यानंतर विकेटकीपर फलंदाज इशान किशनची बॅट चांगलीच तळपली आहे. त्यामुळे त्याच्याकडून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. असं असताना इशान किशनने लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. चला जाणून घेऊयात काय म्हणाला ते..

खरंच की काय? इशान किशनचं लग्न ठरलं! कोणासोबत घेणार सात फेरे?
खरंच की काय? इशान किशनचं लग्न ठरलं! कोणासोबत घेणार सात फेरे? Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 15, 2026 | 3:15 PM
Share

इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्मात असून त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नामिबियाविरूद्धच्या सामन्यात त्याचा आक्रमक बाणा पाहायला मिळाला. इशान किशन आता कोलंबोत आहे. येथे पाकिस्तानविरुद्ध हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यात इशान किशनकडून फार अपेक्षा आहेत. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याचा आक्रमक बाणा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण हे आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. दुसरीकडे वर्ल्डकप विजयाचं स्वप्नही त्याने उराशी बाळगलं आहे. असं असताना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक खुलासा समोर आला आहे. वर्ल्डकप जेतेपदानंतर इशान किशन लग्नबंधनाता अडकणार का? कोणासोबत सात फेरे घेणार? याबाबत त्याचा आजोबांनी सांगितलं. इशान किशनचे आजोबांनी त्याच्या लग्नाबाबत माहिती दिली आहे. इतकंच काय लोकांना काय वाटतं याच्याशी काही देणं घेणं नाही असंही त्यांनी सांगितलं.

आजोबा अनुराग पांडे यांच्या मते, इशान किशन या वर्षी लग्न करेल की ते माहिती नाही. पण तो ज्या कोणासोबत लग्न करेल ते नातं आम्ही आनंदाने स्विकारू. इशानच्या आजोबांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, ‘इशान जिच्याशी लग्न करेल तिला आम्ही स्वीकारू. त्याच्या मोठ्या भावाने सांगितले की तो पल्लवीशी लग्न करेल आणि आम्ही स्वीकारले. आता आम्ही हे देखील स्वीकारू. अदिती त्याची प्रेयसी आहे, ती जयपूरमध्ये राहते. ती एक मॉडेल आहे आणि मिस इंडिया स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आली होती. अदितीने एक जुनी मुलाखत पाहिली आणि तिचे खूप कौतुक केले. इशान जिच्याशी लग्न करेल तिच्यासोबत आम्ही आनंदी आहोत. आमची मुले जिथे आनंदी असतील आपण ते केले पाहिजे. आपण इतरांचं ऐकण्याची गरज नाही.’

कोण आहे आदिती?

आदिती हुंडिया मिस इंडिया कॉन्टेस्टमध्ये दुसर्‍या क्रमांकावर राहिली आहे. तसेच मिस डीवा 2018 ची विजेती आहे मिडिया रिपोर्टनुसार, आदिती हुंडिया सोशल मिडिया स्टार आहे. तसेच मॉडलिंग आणि जाहिरातीतून कोट्यवधींची कमाई करते. तिची नेटवर्थ 12 कोटींच्या घरात आहे. इशान आणि आदितीलची ओळख 2019 आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत झाली होती. मिस्ट्री फॅनगर्ल म्हणून चर्चे आली होती. त्यानंतर इंस्टाग्रामवर लाइक्स आणि कमेंट्समुळे दोघंही चर्चेत असायचे. आता आजोबांनी पोलखोल केल्याने लग्नाचा विषय चर्चेत राहणार आहे.

Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी