Video | मी नाचेन, फिरेन, कुठेही जाईल तुम्हाला काय? बाथटबमधील विद्या बालनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल…

विद्या बालनचा हा मजेदार आणि खास व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. यासोबतच या व्हिडीओवरती कमेंटचा पाऊस पडतोयं. एका चाहत्याने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिले की, 'माझ्या आवडत्या डायलॉगवर परफॉर्म करत आहात तुम्ही.

Video | मी नाचेन, फिरेन, कुठेही जाईल तुम्हाला काय? बाथटबमधील विद्या बालनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल...
| Edited By: | Updated on: Sep 01, 2022 | 2:53 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) कायमच चर्चेत असते. विद्या बालन आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच सोशल मीडियावर स्वत:चा एक मजेदार व्हिडिओ विद्याने शेअर केला आहे, जो आता प्रचंड चर्चेचा विषय ठरलायं. ‘अनुपमा’ ही टिव्ही मालिका (Serial) अत्यंत प्रसिध्द आहे. यामध्ये एक महिला आयुष्यामध्ये ठरवल्यावर काहीही करू शकते आणि अनंत अडचणीवर मात करून पुढे जाऊ शकते हे दाखवण्यात आले आहे. या मालिकेमधील अनेक डायलाॅग फेमस आहेत. या मालिकेमध्ये रुपाली गांगुली मुख्य भूमिकेत आहे. तर याच मालिकेमधील एका डायलाॅगचा व्हिडीओ (Video) विद्या बालनने तयार करून सोशल मीडियावरती शेअर केलायं.

इथे पाहा विद्या बालनचा व्हायरल व्हिडीओ

बाथटबमधील विद्या बालनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आपको क्या हा सोशल ट्रेंड म्हणून समोर आला आहे. विद्या बालन बाथटबमध्ये बसून तिच्या पद्धतीने ‘अनुपमा’ची ओळ बोलताना दिसत आहे. त्याचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विद्या बालन रिकाम्या बाथटबमध्ये बसलेली दिसत आहे. ती ‘अनुपमा’च्या डायलॉग्सवर लिप सिंक करताना दिसत आहे. तिच्या या मजेदार व्हिडिओमध्ये ती म्हणते की…’मी बाहेर फिरू, नाचू, गावू, हसू खेळू, एकटी बाहेर जाऊ, कोणासोबत जाऊ, मी कुठेही जाऊ, कधीही जाऊ, जशीही जाऊ… तुम्हाला काय? हा व्हिडिओ विद्याने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये ‘बोलो बोलो’ असे लिहिले आहे.

‘मी बाहेर फिरू, नाचू, गावू, हसू, खेळू, एकटी बाहेर जाऊ तुम्हाला काय?

विद्या बालनचा हा मजेदार आणि खास व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. यासोबतच या व्हिडीओवरती कमेंटचा पाऊस पडतोयं. एका चाहत्याने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिले की, ‘माझ्या आवडत्या डायलॉगवर परफॉर्म करत आहात तुम्ही. त्यानंतर दुसरा चाहत्यांने लिहिले की, विद्या बालन यांनी अनुपमापेक्षाही जबरदस्त डाॅयलाॅग बोलला आहे. सध्या विद्या बालनचा हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं. चाहत्यांना विद्याचा हा खास व्हिडीओ आवडलेला दिसतोयं.