Wikipedia वर भडकले विवेक अग्निहोत्री; ‘द काश्मीर फाईल्स’बद्दलचा स्क्रीनशॉट केला पोस्ट

| Updated on: May 03, 2022 | 9:29 AM

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे 'विकिपीडिया'वर (Wikipedia) संतापले आहेत. विकिपीडियामध्ये या चित्रपटाचं वर्णन एडिट करण्यात आलं असून त्यावरून अग्निहोत्री भडकले आहेत.

Wikipedia वर भडकले विवेक अग्निहोत्री; द काश्मीर फाईल्सबद्दलचा स्क्रीनशॉट केला पोस्ट
Vivek Agnihotri
Image Credit source: Instagram
Follow us on

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने देशभरात चांगलीच चर्चा घडवून आणली. सिनेमागृह ते सोशळ मीडिया.. अनेकांनी चित्रपटावरून आपापली मतं मांडली. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दाखवण्यात आली. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. यामध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती यांच्यासह इतरही नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे ‘विकिपीडिया’वर (Wikipedia) संतापले आहेत. विकिपीडियामध्ये या चित्रपटाचं वर्णन एडिट करण्यात आलं असून त्यावरून अग्निहोत्री भडकले आहेत.

अग्निहोत्री यांनी ट्विटरवर विकिपीडियाचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. ‘द काश्मीर फाइल्सची कथा ही काल्पनिक, अयोग्य आणि षड्यंत्र रचणाऱ्या सिद्धांतांशी संबंधित आहे,’ असं त्यात म्हटलेलं आहे. त्यावर अग्निहोत्री यांनी लिहिलं, ‘प्रिय विकिपीडिया, तुम्ही इस्लामोफोबिया, प्रचारक, संघी, धर्मांध हेसुद्धा त्यात लिहिण्यात विसरलात. तुम्ही तुमची धर्मनिरपेक्ष बाजू मांडण्यात अपयशी ठरत आहात. लवकर ते अजून एडिट करा’. अग्निहोत्री यांनी विकिपीडियासाठी हे उपरोधिक ट्विट केलं असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

विवेक अग्निहोत्री यांचं ट्विट-

विवेक रंजन अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर यांच्यासोबतच दर्शन कुमार, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, प्रकाश बेलवडी, पुनीत इस्सार, भाषा सुंबली, सौरव वर्मा, मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 300 कोटींचा गल्ला जमवला आहे. 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या चित्रपटाचं कौतुक केलं होतं.