Vivek Agnihotri | बॉडीगार्ड्सला घेऊन विवेक अग्निहोत्री निघाले मॉर्निंग वॉकला, व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री आणि अनुराग कश्यप यांच्यामध्ये सोशल मीडियावर वाॅर सुरू होता.

Vivek Agnihotri | बॉडीगार्ड्सला घेऊन विवेक अग्निहोत्री निघाले मॉर्निंग वॉकला, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Dec 23, 2022 | 7:21 PM

मुंबई : द काश्मीर फाइल्स या चित्रपटामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे चर्चेत आले आहेत. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केला. विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. अनेक विषयांवर ते आपले मत मांडतात. काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री आणि अनुराग कश्यप यांच्यामध्ये सोशल मीडियावर वाॅर सुरू होता. अनुराग कश्यप यांनी म्हटले होते की, पुष्पा आणि कांतारा यासारख्या चित्रपटांमुळे बाॅलिवूडचे नुकसान होत आहे. यावर विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर दिले होते.

सोशल मीडिया कायमच सक्रिय असलेल्या विवेक अग्निहोत्री यांनी आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हाच व्हिडीओ आता तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये विवेक अग्निहोत्री आहेत.

विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ते सकाळी फिरण्यासाठी घराच्या बाहेर पडले आहेत. परंतू यादरम्यान त्यांच्यासोबत चार ते पाच बॉडीगार्ड्स दिसत आहेत.

अनेकांना हा प्रश्न पडल्या की, मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी बॉडीगार्ड्सची काय गरज पडते. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून विवेक अग्निहोत्री यांना ट्रोल करण्यास सुरूवात केलीये.

विवेक अग्निहोत्री यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, काश्मीरमधील हिंदूंचा नरसंहार दाखविण्याची ही किंमत आहे…हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ही शिक्षा आहे….