Prahaar Box Office Collection : ललित प्रभाकरच्या ‘प्रहार’ सिनेमाच्या कमाईला गळती, आदिनाथ कोठारेच्या सिनेमाची सरशी

ललित प्रभाकरच्या प्रहार या सिनेमाच्या कमाईत सुरूवातीपासूनच प्रचंड चढ - उतार पाहायला मिळत आहे. या सिनेमात ललित प्रभाकर याच्या अभिनयाचे जरी कौतुक केले जात असले तरी या चित्रपटाच्या कमाईला गळती लागल्याचे दिसत आहे. तर आदिनाथ कोठारेचा सिनेमा प्रहारच्या पुढे आहे.

Prahaar Box Office Collection :   ललित प्रभाकरच्या प्रहार सिनेमाच्या कमाईला गळती, आदिनाथ कोठारेच्या  सिनेमाची सरशी
lalit prabhar and adhinath kothare
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 23, 2026 | 3:47 PM

राजकुमार राव आणि ललित प्रभाकर यांच्या प्रहार : द उज्वल निकम स्टोरी या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड ही सुरूच आहे. सरकारी वकील उज्वल निकम यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या खटल्यावर आधारित या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिला आठवड्यात जगभरात 22.94 कोटी रूपयांची कमाई केली आहे. मात्र सुरूवातीच्या दिवसांच्या तुलनेत चित्रपटाच्या दिवसागणिक कमाईत चढ- उतार पाहायला मिळत आहेत.

सातव्या दिवशी किती कमाई ?

मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाने प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी भारतात चांगली कमाई केली आहे. पहिल्या आठवड्याच्या अखेरी या चित्रपटातील जगभरातील एकूण कमाई 22.94 कोटीं रूपयांवर पोहोचली आहे. तर सातव्या दिवशी भारतात 1.20 कोटी ते 1.43 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे.

Loading...

उज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित कथा

‘प्रहार’ हा चित्रपट सरकारी वकील उज्वल निकम यांच्या कारकि‍र्दीवर आधारित आहे. देशातील अनेक चर्चित गुन्हेगारी खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 1993 मधील मुंबई बॉबस्फोट आणि 2008 मधील मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटल्यांचा संदर्भही चित्रपटात येतो.

राजकुमार राव याने उज्वल निकम यांची भूमिका साकारली तर कसाबच्या भूमिकेत मराठी अभिनेता ललित प्रभाकर झळकला. कसाबच्या भूमिकेसाठी ललितने घेतलेल्या मेहनतीवर आज सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अविनाश अरूण यांनी केलं आहे.

 

पहिल्या आठवड्यात कमाईत प्रचंडव चढ – उतार

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सुरूवातीच्या दिवसांत कमाईत वाढ झाली होती. मात्र आठवड्याच्या मध्यावर कमाई कमी झाल्याचं दिसलं . त्यानंतरही कमाईत फारशी वाढ झालेली नाही. सातव्या दिवसापर्यंत एकूण कमाई 22.94 कोटींवर पोहोचली आहे.

आदिनाथ कोठारेचा नयी नवेलीची सरशी

आदिनाथ कोठारेच्या नयी नवेली या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी उत्तम कामगिरी केली होती, मात्र सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने अंदाजे 2.5 कोटींची कमाई केली. नयी नवेलीची भारतातील कमाई 20 कोटींच्या पार गेली आहे. मात्र अजूनही हा चित्रपट आपला खर्च वसूल करू शकला नाही आहे.

नयी नवेली या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे यश मिळवले नसले तरी आदिनाथ कोठारेच्या या हॉरर कॉमेडी सिनेमाने ललित प्रभाकरच्या ‘प्रहार’या सरशी मारली आहे.बॉक्स ऑफिसवरील या शर्यतीत नयी नवेलीने बाजी मारली आहे. हा सिनेमा प्रहारपेक्षा 6.12 कोटींनी पुढे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us