AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झुम करणे हे प्रायव्हसीचे उल्लंघन’, जान्हवी कपूर झाली पापाराझींवर नाराज

आपल्या बिनधास्तपणाबद्दल आणि रोखठोक मतांबद्दल प्रसिध्द असलेली अभिनेत्री जान्हवी कपूर हीने पापाराझ्झी कडून होत असलेल्या त्रासाला वाचा फोडली आहे.

'बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झुम करणे हे प्रायव्हसीचे उल्लंघन', जान्हवी कपूर झाली पापाराझींवर नाराज
Janhvi Kapoor
| Updated on: Apr 05, 2026 | 10:58 PM
Share

पापाराझ्झींकडून कोणाच्याही बॉडी पार्ट्सना झुम करुन फोटो काढण्याच्या पद्धतीवर अभिनेत्री जान्हवी कपूर हिने टीकास्र सोडले आहे. ती म्हणाली ड्रेस कसाही असो त्यांच्या परवानगी शिवाय बॉडी पार्ट्सना झुम करुन फोटो काढणे मर्यादेचे उल्लंघन असल्याचे तिने म्हटले आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर म्हणाली की पॅप्स (paparazzi) त्यांच्या शरीराचे फोटो झूम करुन काढतात ते खाजगीपणाचे उल्लंघनच आहे. राज शमानी यांना दिलेल्या मुलाखतीत जान्हवी कपूर हीने ही भूमिका मांडली आहे.

जान्हवी कपूर हीने सांगितले की काही दिवसापूर्वी तिने स्वत: पपाराझ्झीशी स्वतंत्र भेट घेऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की त्यांचे काम कधी-कधी किती चुकीच्या दिशेने जात असते. जान्हवी हीने त्यांना सांगितले की ज्या प्रकारे तुम्ही महिलांचे फोटो काढता. ते केवळ आमच्यासाठी वाईट नसून तूमची स्वत:ची छबि देखील खराब करते. तिने फोटोग्राफर्सना आरसा दाखवत विचारले की केवळ काही पैशांसाठी वा जास्त व्यूजसाठी कोणा महिलेच्या शरीराचे तिच्या मर्जी शिवाय एका वस्तू सारखा वापर करुन तुम्हाला स्वत:च्या नजरेत इज्जत मिळते का ? जान्हवी हीच्या मतानुसार पॅप्सने तिचे म्हणणे गंभीरपणे ऐकले आणि आपली चूक कबूल केली.

भीगी साडी गाण्याचे उदाहरण दिले

आपली गोष्ट आणखी क्लिअर करण्यासाठी जान्हवी हने तिच्या ‘भीगी साडी’ गाण्याचे उदाहरण दिले. ती म्हणाली की त्या गाण्यात तिने जाणूनबुजून एक सेंसुअल(Sensual) भूमिका स्वीकारली होती. कारण ती तिची पसंद आणि चित्रपटाची मागणी होती.

तिने सांगितले की तिथे मी माझ्या मर्जीने ते काम केले होते. परंतू जेव्हा मी माझ्या खाजगी जीवनात बाहेर पडते, तेव्हा माझ्या पसंतीचे कपडे घालण्यासाठी स्वतंत्र आहे. याचा अर्थ हा अजिबात नाही की कोणीही कॅमेरा लावून माझ्या माहिती शिवाय माझ्या बॉडी पार्ट्स झुम करुन वा त्या व्हिडीओ स्लो मोशन आणि अजब म्युझिक टाकून त्यांना व्हायरल करावे. परवानगी शिवाय कोणालाही सेक्शुअलाइज करणे चुकीचे आहे.

मला नाही म्हणण्याचा हक्क

जान्हवी हीने केवळ रस्त्यातील पापाराझींवरच नव्हे तर फिल्मच्या सेटवर काम करण्याच्या पद्धतीवर देखील तिचे मत मांडले. तिने सांगितले की सहमतीचा अधिकार सर्वत्र असायला हवा. जर चित्रपटाच्या सेटवरही कॅमेरा कोणत्या अँगलने लावला जात असेल तर आणि ज्यामुळे मला असहजता वाटत असेल तर मला नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे. असे बोलण्याने मला ‘अनप्रोफेशनल’ ठरवणे योग्य नाही.तिने सांगितले की प्रत्येक पावलांवर विचारणे गरजेचे आहे की कलाकाराने कोणत्या गोष्टीसाठी सहमती दिली आहे आणि कुठे तिची प्रायव्हसीचे उल्लंघन होत आहे.

मुलाखती दरम्यान जान्हवी हिच्या बोलण्यावरून हे स्पष्टपणे दिसून आले की, अशा प्रकारांमुळे ती खूप अस्वस्थ आहे. तिला विश्वास आहे की, विशिष्ट प्रकारे कपडे घातल्याने किंवा ग्लॅमरस दिसल्याने, कोणालाही तुमच्या परवानगी शिवाय तुमच्या शरीराला एका प्रोडक्ट प्रमाणे वागवण्याचा अधिकार मिळत नाही.

Follow Us
मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण!
Gold And Silver Rate Hike | पंतप्रधान मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण! सोनं तब्बल ₹4,950 तर चांदी ₹8,000 ने घसरली
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियन यांच्या वडिलांची CBI तपासानंतर पहिली प्रतिक्रिया समोर
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!