AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chak De India : ‘चक दे! इंडिया’सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा नाकारला, आता ‘या’ अभिनेत्रीला होतोय पश्चाताप

Chak De India: शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' चित्रपट खूप गाजला. एका बॉलिवूड अभिनेत्रीला ही फिल्म ऑफर झाली होती, पण तिने तो करण्यास नकार दिला.आता तिला या निर्णयाचा खूप पश्चाताप होतोय. कोण होती ती अभिनेत्री ?

Chak De India : ‘चक दे! इंडिया’सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा नाकारला, आता 'या' अभिनेत्रीला होतोय पश्चाताप
| Updated on: Oct 17, 2026 | 2:28 PM
Share

Chak De India : बॉलिवूडचा किंग, अभिनेता शाहरुख खानने त्याच्या करिअरमध्ये एकाहून एक असे सरस , हिट चित्रपट दिलेत. ज्यामध्ये ‘चक दे इंडिया’ चं नाव सर्वात वर येतं. अतिशय दमदार, स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या या चित्रपटाचा आजही मोठा चाहतावर्ग आहे, क्रिटिक्सनाही हा चित्रपट खूप आवडला. या फिल्ममध्ये शाहरुख खानने कोच कबीर खानची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाबद्दल अभिनेत्री नेहा धुपियाने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला. ब्लॉकबस्टर अशा या चित्रपटाचा भाग बनता न आल्यामुळे तिला आजही पश्चाताप होतो.

अलीकडेच आपल्या ‘डबल डेट’ या चॅट शोदरम्यान झालेल्या एका मजेशीर संवादात नेहा धुपियाने खुलासा केला की, तिने शाहरुख खानच्या एका चित्रपटाची ऑफर नाकारली होती. मात्र, त्यावेळी हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मोठा क्लासिक ठरेल, याची तिला कल्पनाही नव्हती. नेहाने हेही सांगितले की, तिला नेहमीच एका उत्तम स्पोर्ट्सवर आधारित चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे ‘चक दे! इंडिया’सारखा चित्रपट नाकारणे ही तिच्या कारकिर्दीतील एक मोठी गमावलेली संधी ठरली.

फिल्मबद्दल काय म्हणाली नेहा धूपिया ?

“ कधीकधी, जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता आणि नाकारलेल्या संधींचा विचार करता, तेव्हा तुम्ही काय गमावलतं, याची तुम्हाला जाणीव होते. ‘चक दे! इंडिया’ आणि ‘ऑपरेशन सफेद सागर’ या अशाच दोन संधी आहेत, ज्या अजूनही माझ्या मनात राहिल्या आहेत.” असं एका चॅट शोमध्ये नेहा धुपियाने सांगितलं. मात्र, ‘चक दे! इंडिया’मध्ये तिला कोणती भूमिका साकारण्याची ऑफर मिळाली होती, याचा खुलासा काही नेहाने केला नाही.

शिमित अमीन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खानने कबीर खानची भूमिका साकारली होती. कबीर खान हा भारतीय पुरुष हॉकी संघाचा माजी कर्णधार असतो, जो पुढे भारतीय महिला हॉकी संघाची जबाबदारी स्वीकारतो. चित्रपटाची कथा कबीर खान आणि महिला हॉकी संघातील खेळाडूंभोवती फिरते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करताना खेळाडूंना संघातील मतभेद आणि अनेक आव्हानांचाही सामना करावा लागतो.

नेहाने यावेळी सांगितले की, “मला नेहमीच एक चांगला स्पोर्ट्स चित्रपट आणि एक चांगला लष्करी चित्रपट करायचा होता; पण या दोन मोठ्या संधी माझ्या हातातून निसटल्या.”

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल