राजपाल यादवचे 4 कॉमेडी चित्रपट, टेंशनमध्ये असणारा माणूस देखील हसू लागतो, शेवटचा तर प्रचंड कॉमेडी

बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडी किंग राजपाल यादवचे हे 4 चित्रपट पाहून कितीही दुखात असलेला माणूस हसू लागतो. शेवटचा तर प्रचंड चर्चेत.

| Updated on: Feb 12, 2026 | 12:51 PM
1 / 7
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन राजपाल यादव सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकतेच चेक बाऊन्स प्रकरणात त्याने न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले असून सध्या तो दिल्लीतील तिहार जेलमध्ये आहे.

2 / 7
आज ज्या चेहऱ्यावर वेदना आणि अश्रू दिसत आहेत, त्याच चेहऱ्याने एकेकाळी प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. कधी काळी ‘कॉमेडी किंग’ म्हणून ओळखले जाणारा राजपाल यादव आज आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहेत.

3 / 7
आज आपण त्याच्या आयुष्यात अडचणींचा काळ असला तरी त्याच्या गाजलेल्या चित्रपटांमधील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. अशाच राजपाल यादव याच्या 4 आयकॉनिक कॉमेडी चित्रपटाबद्दल बोलणार आहोत, ज्याने प्रेक्षकांना प्रचंड हसवले.

4 / 7
दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘भागम भाग’ हा एक सुपरहिट कॉमेडी चित्रपट ठरला. अक्षय कुमार, गोविंदा आणि परेश रावल यांच्यासोबत राजपाल यादवची भूमिका लहान असली तरी लक्षवेधी होती. त्याच्या कॉमेडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

5 / 7
सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा स्टारर ‘मुझसे शादी करोगी’मध्ये राजपाल यादवने पंडिताची भूमिका साकारली होती. त्याच्या संवादांनी आणि अभिनयाने चित्रपटात वेगळीच रंगत आणली. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर तुम्ही पाहू शकता.

6 / 7
2003 मध्ये प्रदर्शित झालेला प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हंगामा’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अक्षय खन्ना, आफताब शिवदासानी, परेश रावल आणि रिमी सेन यांच्यासोबत राजपाल यादवची भूमिका छोट्या पडद्यावरील बॉम्ब ठरली. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

7 / 7
अक्षय कुमार स्टारर ‘भूल भुलैया’मध्ये छोटा पंडित ही राजपाल यादवची भूमिका आजही लोक विसरू शकलेले नाहीत. या चित्रपटाच्या यशामागे त्याच्या कॉमेडीचा मोठा वाटा होता. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.