CJP चं समर्थन केलं म्हणून अनफॉलो करणाऱ्यांना विजय वर्माचं सडेतोड प्रत्युत्तर
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी'ने आंदोलन पुकारल्यानंतर देशातील असंख्य तरुण रस्त्यांवर उतरले आहेत आणि हक्कांसाठी लढत आहेत. अशात त्यांना सेलिब्रिटींचा पाठिंबा मिळत आहे. पण CJP चं समर्थन केलं म्हणून अभिनेता विजय वर्मा याला अनेकांना अनफॉलो केलं... यावर अभिनेत्याने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

Cockroach Janta Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. ज्यामुळे अनेकांनी सरकारवर टीका केली आहे. आंदोलनात सहभागी झालेले अनेक तरुण – तरुणी गंभीर जखमी आहेत. तर दुसरीकडे, जे CJP चं समर्थन करत आहेत, त्यांना सोशल मीडियावरुन अनफॉलो करण्यात येत आहे… यावर अभिनेता विजय वर्मा याने मोठं वक्तव्य केलं आहे. विजय याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत कोणाचं नाव न घेत, लोकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. अभिनेता म्हणतो, ‘प्रत्येक चांगल्या कामाचा सोशल मीडियावर देखावा करण्याची काहीही गरज नाही. जर कोणाची मदत करायची असेल तर, गुपचूप राहून देखील करता येते…’ असं देखील अभिनेता विजय वर्मा म्हणाला.
विजय वर्मा पुढे म्हणाला, ‘प्रत्येक व्यक्ती आपली जबाबदारी आपल्या परीने निभावतो आणि या गोष्टीची प्रत्येक घोषणा करण्याची काहीही गरज नाही…’, कोणत्या विषयावर आपली भूमिका मांडण्याचा अर्थ असा होत नाही की, आपलं मत सर्वांना आवडेलच… असं देखील अभिनेत्याने स्पष्ट केलं.
सोशल मीडियावर अनफॉलो करण्याऱ्यांना विजय याने सडेतोड उत्तर दिलं आहे, पण अभिनेत्याने कोणाचं नाव घेतलं नाही. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत विजय म्हणाला, ‘गुपचूप देखील अनफॉलो करु शकता, सगळं काही सांगण्याची काहीही गरज नाही…’, अशी पोस्ट करत अभिनेत्याने हसण्याची इमोजी लावली आहे.
विजय वर्माचं विद्यार्थ्यांना समर्थन…
विजय वर्मा याने यापूर्वी दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शविला होता. त्याचप्रमाणे, शैक्षणिक सुधारणा आणि कथित पेपर लीक प्रकरणातील उत्तरदायित्वाची मागणी करत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थही त्यांनी पोस्ट केली होती. या आंदोलनादरम्यान, दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना सेलिब्रिटींचं समर्थन
फक्त विजय वर्माच नाही तर, अन्य सेलिब्रिटींनी देखील विद्यार्थ्यांचं समर्थन केलं आहे. रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, हुमा कुरेशी, शबाना आझमी, सोनी राजदान, अनुराग कश्यप, विशाल ददलानी, सोनाक्षी सिन्हा, अतुल कुलकर्णी यांनी देखील समर्थन केलं आहे.