Video | ‘व्हॅलेंटाईन वीक’ मध्ये आलियाचा कहो ना प्यार है पॅटर्न, भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल!

अभिनेत्री अलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या मालदीवच्या समुद्र किना-यावर सुट्टी एन्जॉय करत आहे.

Video | 'व्हॅलेंटाईन वीक' मध्ये आलियाचा कहो ना प्यार है पॅटर्न, भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल!

मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानं सगळेच आपआपल्या घरात अडकलेले होते. मात्र अनलॉक होताच तुमच्या लाडक्या कलाकारांनी मालदीव गाठलं. सोनाक्षी सिन्हा, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी, सारा अली खान, वरुण धवन अशा अनेक कलाकारांनी या अनलॉकनंतर मालदीव सफर केली. आता यात भर पडली आहे ती म्हणजे आलिया भट्टची  (Alia Bhatt) सध्या मालदीवच्या समुद्र किना-यावर सुट्टी एन्जॉय करत आहे. (Dance video on Alia Bhatt’s song ‘Kaho Na Pyaar Hai’ goes viral)

आलिया भट्ट तिच्या मालदीवच्या सुट्टीची फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. आलियाची मैत्रिण अनुष्काने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये आलिया ‘कहो ना प्यार है’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये अलियासोबत अनुष्का आणि आकांक्षा देखील दिसत आहेत. हा व्हिडीओ बीचवर तयार करण्यात आला आहे.

अनुष्काने तिच्या इंस्टा स्टोरीवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये समुद्राच्या किनाऱ्यांवर दुपारचे जेवण करताना दिसत आहेत. आलिया तिची बहीण शाहीन आणि मैत्रिण आकांक्षा, अनुष्का रंजन कपूरसोबत मालदीवच्या ट्रिपवर आहे खूप एन्जॉय करताना दिसत आहे. आलिया भट्टची मालदीवच्या ट्रिपची अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत.

आलियाची बहीण शाहीन भट्टनेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मालदीवची झलक शेअर केली आहे. ज्यात तिने मालदीवचा समुद्र किनारा दाखवला आहे. अलिया ‘सडक 2’ चित्रपटात दिसली होती. रणबीर कपूरसोबत आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातही काम करत आहे. यावर्षी आलियाचा आणखी एक मोठा चित्रपट ‘आरआरआर’ देखील प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या : 

करण जोहरच्या मुलांच्या बर्थ डे पार्टीत तैमुरची हजेरी, अनेक स्टारकिडची हजेरी, पाहा फोटो…

नव्या-मीजानच्या रिलेशनशिपवर जावेद जाफरी यांनी केलं मोठं भाष्य!

Video | अंकिता लोखंडेचा ‘धक-धक करने लगा’ डान्स पाहिला का?; तुमचंही काळीज धक धक करेल!

(Dance video on Alia Bhatt’s song ‘Kaho Na Pyaar Hai’ goes viral)

Published On - 11:27 am, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI