Video | अंकिता लोखंडेचा ‘धक-धक करने लगा’ डान्स पाहिला का?; तुमचंही काळीज धक धक करेल!

Video | अंकिता लोखंडेचा 'धक-धक करने लगा' डान्स पाहिला का?; तुमचंही काळीज धक धक करेल!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 07, 2021 | 5:37 PM

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. अंकिता सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याच वेळा तिच्या काही फोटो आणि व्हिडीओमुळे तिला ट्रोल केले जाते. नुकताच अंकिताने एक व्हिडीओ शेअर केला आहे त्यामध्ये अंकिता ‘धक-धक करने लगा’ या गाण्यावर माधुरी दीक्षित सारखा डान्स करताना दिसत आहे. अंकिताचा हा डान्स सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. (Dance goes viral on Ankita Lokhande’s song ‘Dhak-Dhak Karne Laga’)

मध्यंतरी सोशल मीडियावर अंकिताचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यामध्ये अंकिताने हाताला मेंहदी लावलेली होती. यामुळे चाहते असा अंदाजा लावताना दिसत होते की, अंकिताने गुपचूप मेहंदीच्या कार्यक्रम आणि रोका सेरेमनी केली आहे.

चाहेत तिला विकी जैनसोबत लग्न करणार आहे का असा प्रश्न देखील विचारताना दिसले होते. अंकिता लोखंडे आणि तिच्या बहीणीने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरी वर काही फोटो शेअर केले होते. त्यामुळे अंकिताच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले होते. अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)काही वर्ष रिलेशनशीपमध्ये होते.

एका टीव्ही सिरियलमध्ये त्यांची ओळख झाली होती. पुढे ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांचर प्रेमात झालं. मग गाठीभेटी वाढल्या साहजिकच एकमेकांच्या घरी जाणं येणं झालं. काही वर्षांपूर्वी अंकिता सुशांतच्या पाटन्याच्या घरी गेली होती. यावेळी तिथे सुशांतचे सगळे कुटुंबीय होते. त्यांच्या कुटुंबीयांनाही अंकिता आणि सुशांतच्या नात्याची कल्पना होती.

संबंधित बातम्या : 

श्रद्धा कपूर फॅन्सला म्हणाली, शून्य म्हणजे काय रे भाऊ?; लवकरच देणार मोठं सरप्राईज

अमिताभ-अजयने ‘Mayday’ चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरूवात, पाहा सेटवरचे काही खास फोटो!

कन्यारत्न झाल्यानंतरचा अनुष्का शर्माचा ग्लॅमरस लूक बघितला का?

(Dance goes viral on Ankita Lokhande’s song ‘Dhak-Dhak Karne Laga’)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें