करण जोहरच्या मुलांच्या बर्थ डे पार्टीत तैमुरची हजेरी, अनेक स्टारकिडची हजेरी, पाहा फोटो…

करण जोहरच्या मुलांच्या बर्थ डे पार्टीत तैमुरची हजेरी, अनेक स्टारकिडची हजेरी, पाहा फोटो...

बॉलिवूड चित्रपटांचे निर्माता करण जोहरची (Karan Johar) मुले यश आणि रुही (Yash and Ruhi) 7 फेब्रुवारीला 4 वर्षांची झाली आहेत.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 08, 2021 | 10:14 AM

मुंबई : बॉलिवूड चित्रपटांचा निर्माता करण जोहरची (Karan Johar) मुले यश आणि रुही (Yash and Ruhi) 7 फेब्रुवारीला 4 वर्षांची झाली आहेत. दोन्ही मुलांच्या वाढदिवशानिमित्त करणने घरी एका ग्रॅंन्ड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी तैमुर अली खान (Taimur Ali Khan) आई करिनासोबत, अब्राम गौरी खानसोबत, मेहर नेहा धूपियासोबत या पार्टीला पोहोचले होते. इतकेच नाही तर तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य आणि राणी मुखर्जीची मुली देखील या पार्टीला आले होते. (Karan Johar’s children Yash and Ruhi Birthday, the presence of Taimur Ali Khan and other Starkids)

यश आणि रुही यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली आहेत. करिना कपूर खानने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली होती. करणने आपल्या मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता त्या व्हिडीओमध्ये यश आणि रूही दोघेही दिसत होते. करणने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले होते की, आज माझ्या आयुष्यातील प्रेमाचा वाढदिवस आहे.

करणच्या या पोस्टवर बर्‍याच सेलेब्रिटींनी दोन्ही मुलांना वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता अरोराने करणच्या या व्हिडीओवर कमेंट करताना म्हटलं आहे की, वाढदिवसाच्या शुभेच्छा डार्लिंग रुही आणि यश, 2017 मध्ये करण जोहर जुळ्या मुलांचा पिता झाला आहे. त्याने आपल्या मुलांचे नाव वडील यश जोहर आणि आई रूही जोहर यांच्या नावावर ठेवले आहे.

संबंधित बातम्या :

नव्या-मीजानच्या रिलेशनशिपवर जावेद जाफरी यांनी केलं मोठं भाष्य!

Video | अंकिता लोखंडेचा ‘धक-धक करने लगा’ डान्स पाहिला का?; तुमचंही काळीज धक धक करेल!

अमिताभ-अजयने ‘Mayday’ चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरूवात, पाहा सेटवरचे काही खास फोटो!

(Karan Johar’s children Yash and Ruhi Birthday, the presence of Taimur Ali Khan and other Starkids)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें