Big Announcement | करण जोहर करणार मोठ्या चित्रपटाची घोषणा!

करण जोहर (Karan Johar) पुन्हा एकदा नवीन चित्रपटाची घोषणा करणार आहे. करणने रविवारी एक ट्विट केले होते त्यामध्ये त्याने लिहिले होते की, सोमवारी सकाळी 10.8 वाजता मोठी घोषणा करणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:52 AM, 18 Jan 2021
Big Announcement | करण जोहर करणार मोठ्या चित्रपटाची घोषणा!

मुंबई : करण जोहर (Karan Johar) पुन्हा एकदा नवीन चित्रपटाची घोषणा करणार आहे. करणने रविवारी एक ट्विट केले होते त्यामध्ये त्याने लिहिले होते की, सोमवारी सकाळी 10.8 वाजता मोठी घोषणा करणार आहे. सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर करण जोहरला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. चित्रपट माफियाच्या नावाखाली त्याला जोरदार टार्गेट करण्यात आले होते. पण आता सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत करण त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करणार आहे. करण जोहरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, चित्रपटाचे पोस्टर आणि फस्ट लूक आज प्रदर्शित करणार आहोत. (Karan Johar will announce his new film today)

आता करण नेमक्या कोणत्या चित्रपटाची घोषणा करतो याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे. गौतम अदानी करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये 30 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहेत आणि तशी चर्चा देखील सुरू झाल्याची माहिती बॉलिवूड हंगामाच्या सूत्रांनी दिली होती. करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शन ही सर्वात मोठी आणि सर्वाधिक चित्रपट बनवते. रणवीर-आलिया आणि अमिताभ बच्चन यांचा आगामी ब्रह्मास्त्र हा चित्रपट अद्याप पूर्ण झाला नाही आणि त्याचे बजेट 300 कोटींच्यावर गेले आहे.

याशिवाय जुग जुग जियो, शेरशाह, रणभूमि, दोस्ताना 2 ते सूर्यवंशी या मोठ्या बजेट चित्रपट दीपिका आणि तख्त यांचा हा चित्रपट यंदा हे रिलीज होऊ शकतात. भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी गौतम अदानी एक आहेत. त्यांनी यूपीमध्ये 35 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. जर करणचा आणि गौतम अदानी हा करार झाला आणि अदानी करण मिळून बॉलिवूडमधील चित्र बदलू शकेत.

संबंधित बातम्या : 

Tandav : राम कदम यांचं पोलीस ठाण्यात ‘तांडव’; वेब सीरिजच्या निर्मात्यांना समन्स पाठवणार

Drugs Case : ड्रग्ज प्रकरणी दीया मिर्झाच्या माजी मॅनेजरसह करण सजनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

(Karan Johar will announce his new film today)