Tandav : राम कदम यांचं पोलीस ठाण्यात ‘तांडव’; वेब सीरिजच्या निर्मात्यांना समन्स पाठवणार

पोलिसांनी तांडवच्या निर्मात्यांसह तिघांना समन्स पाठवणार असून त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. (Ram Kadam aggressive about 'Tandav' web series)

  • गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी
  • Published On - 13:15 PM, 17 Jan 2021
Tandav : राम कदम यांचं पोलीस ठाण्यात 'तांडव'; वेब सीरिजच्या निर्मात्यांना समन्स पाठवणार

मुंबई: बहुचर्चित तांडव वेबसिरीजला भाजपनं विरोध दर्शवला आहे.या संदर्भात भाजपचे आमदार राम कदम हे चिराग नगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. तांडव चित्रपटाच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनपासून हटणार नाही ही अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
पोलिसांचं कदमांना आश्वासन
पोलिसांनी तांडवच्या निर्मात्यांसह तिघांना समन्स पाठवणार असून त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलिसांनी तसं आश्वासन दिल्याने राम कदम पोलीस ठाण्यातून बाहेर पडले आहेत.

त्याचबरोहर भाजपचे खासदार मनोज कोटक यांनीसुद्धा या वेबसिरीज विरोधात आक्षेप घेतला आहे. या वेबसिरीजमध्ये हिंदू विरोधी कंटेंट असल्याचा आणि हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे तांडव वेबसिरीज बॅन करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. मनोज कोटक यांनी सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना तसं पत्र लिहिलं आहे. त्याचबरोबर वेबसिरीजच्या निर्मात्याने माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.(BJP demands ban on Tandav web series, allegations of hurting Hindu sentiments)

तांडव वेबसिरीज ही एक पॉलिटिकल ड्रामा आहे. ही वेबसिरीज काहींच्या चांगलीच पसंतीला उतरत आहे. तर काहींच्या मते या वेबसिरीजद्वारे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मोहम्म जिशान आयुब याच्यावर चित्रित एका दृश्यावरुन हा वाद रंगला आहे. या दृश्यामुळे हिंदू देवदेवतांचा अपमान झाला असल्याचा आरोप करत निर्मात्यांनी लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी सोशल मीडियातून होत आहे. त्याचबरोबर या वेबसिरीजविरोधात हॅशटॅग मोहीमही राबवली जात आहे. ही वेबसिरीज अली अब्बास जाफरने दिग्दर्शित केली असून, यात सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत आहेत.

निर्मात्याने माफी मागावी – कोटक
भाजप आमदार मनोज कोटक यांनीही या वेबसिरीजला विरोध दर्शवला आहे. वेबसिरिजमध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान करण्यात आला असून, त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे या वेबसिरीजवर बंदी घालण्यात यावी आणि वेबसिरीजच्या निर्मात्याने माफी मागावी अशी मागणी कोटक यांनी केली आहे. तसं पत्रच त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लिहिलं आहे. त्यामुळे आता जावडेकर या वेबसिरीजबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

‘तांडव’मधील महत्वाचे चेहरे
या वेब सीरीजमध्ये डिंपल कपाडिया, दिनो मोरिया, तिग्मांशू धुलिया, गौहर खान, मोहम्मद झीशान, कृतिका कामरा, सुनील ग्रोहर, अनूप जोशी, कुमुद मिश्रा हे महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. तांडव वेब सीरीज 15 जानेवारीला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली आहे.