Deepika Padukone | भगव्या रंगाची बिकिनी ते ‘पद्मावत’ला झालेला विरोध… अखेर दीपिकाने सोडलं मौन

‘पद्मावत’ आणि 'पठाण' सिनेमातील भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दीपिका पादुकोण हिच्या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण

Deepika Padukone | भगव्या रंगाची बिकिनी ते ‘पद्मावत’ला झालेला विरोध... अखेर दीपिकाने सोडलं मौन
| Updated on: May 11, 2023 | 4:48 PM

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दीपिका पादुकोण. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्रीने स्वतःचा मोर्चा हॉलिवूडच्या दिशेने वळवला. दीपिका हिच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील आहे. ऑस्कर २०२३ पुरस्कार सोहळ्यात प्रेजेंटर म्हणून मान मिळवणारी दीपिका बॉलिवूडची पहिली अभिनेत्री ठरली. दीपिकाने अनेकदा भारतातचं नाव मोठं केलं आहे… ‘ओम शांती ओम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दीपिका आज इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

दीपिका पदुकोणने फक्त देशात नाही तर संपूर्ण जगात तिने एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. नुकताच दीपिका ‘टाइम’ या जगातील प्रतिष्ठित मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली आहे. ज्यामुळे अभिनेत्री पुन्हा चर्चेत आली. यशाच्या उच्च शिखरावर विराजमान असणाऱ्या दीपिकाने खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना केला आहे.

दीपिका हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी करणी सेनेकडून सिनेमाला विरोध करण्यात आला. त्यानंतर ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यात घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे अभिनेत्रीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी झालेल्या विरोधावर अखेर दीपिकाने मौन सोडलं आहे. दीपिका म्हणाली, ‘सिनेमांवरुन होणाऱ्या वादग्रस्त परिस्थितींमध्ये अडकण्यापेक्षा मी माझ्या कामात लक्ष देणं योग्य समजते…’ असं अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

 

 

पुढे दीपिका हिला, ‘तुझ्या सिनेमांबद्दल अनेक राजकारणी मत मांडताना दिसतात, त्याबद्दल तुला काय वाटतं?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘त्यांच्या मतांवर मला काही वाटलं पाहिजे की नाही, याबद्दल मला खरंच काही माहिती नाही. पण मला यातील कोणत्याच गोष्टींनी महत्त्व द्याव असं वाटत नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…

दीपिका कायम तिच्या खाजगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. दीपिकाच्या हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात महानायक अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय ‘प्रोजेक्ट के’ सिनेमात दीपिका पहिल्यांदा अभिनेता प्रभास याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.