
माधुरी दीक्षितची घायाळ करणारी सुंदरता, तिचं गोड हसू आणि सदाबहार अभिनयाशी प्रत्येकजण परिचित आहे. माधुरी ही बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींच्या यादीत कायम टॉपमध्ये राहिली आहे.

मोठ्या पडद्यावर तर माधुरी सुंदर दिसतेच पण रियल लाईमध्येही तिच्या सुंदरतेला तोड नाही.

बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित चाहत्यांच्या मनावर नेहमीच राज करते. प्रत्येकाला माधुरीच्या सौंदर्याचे कुतूहल आहे.

आता माधुरीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. नुकतंच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

स्काय ब्ल्यू रंगाच्या लेहेंग्यामध्ये तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या ही पसंतीस उतरत आहेत. फ्लोरल प्रिंट असलेल्या या लेहेंग्यासोबत तिनं ऑक्सिडाइज ज्वेलरी कॅरी केली आहे.