AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Funeral : धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सेलिब्रिटी स्मशानभूमीवर; कोण देणार मुखाग्नी?

Dharmendra Funeral : धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर पोहोचले आहेत. अमिताभ बच्चन, आमिर खान, सलमान खान हे स्मशानभूमीवर पोहोचले आहेत.

Dharmendra Funeral : धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सेलिब्रिटी स्मशानभूमीवर; कोण देणार मुखाग्नी?
आमिर खान, ईशा देओल, अमिताभ बच्चनImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 24, 2025 | 2:56 PM
Share

Dharmendra Funeral : या महिन्याच्या सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा सलमान खान, शाहरुख खान, सलमान खान, आर्यन खान, गोविंदा यांनी रुग्णालयात त्यांची भेटी घेतली होती. परंतु धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचं नंतर हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्यांना डिस्चार्जदेखील देण्यात आला होता. धर्मेंद्र यांना जुहू इथल्या निवासस्थानी आणलं गेलं होतं, जेणेकरून त्यांची प्रकृती सुधारेल. परंतु आज (24 नोव्हेंबर) कडक सुरक्षाव्यवस्था असलेल्या त्यांच्या जुहू इथल्या निवासस्थानी एक रुग्णवाहिका येताना दिसली. त्यानंतर आता धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं आहे.

धर्मेंद्र यांच्या निवासस्थानाहून रुग्णवाहिका निघाली आणि त्यानंतर लगेचच मुंबईतील पवन हंस स्मशानभूमीतील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली. त्यानंतर हेमा मालिनी, ईशा देओल स्मशानभूमीवर पोहोचल्या. त्यांच्या पाठोपाठ आमिर खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, सलमानसुद्धा तिथे पोहोचले. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास धर्मेंद्र यांचं निधन झाल्याचं कळतंय. याबाबत देओल कुटुंबीयांनी अद्याप कोणतीच माहिती दिली नाही. धर्मेंद्र यांना 12 नोव्हेंबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.

विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओल त्यांना मुखाग्नी देईल.

हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक हिट चित्रपटांमध्ये काम करण्याचा विक्रम धर्मेंद्र यांच्या नावावर आहे. 2012 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांनी सहा दशकांहून अधिकच्या कारकिर्दीत तब्बल 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. 1960 मध्ये त्यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. 1960 ते 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. 2024 मध्ये ते शाहिद कपूर आणि क्रिती सनॉनच्या ‘तेरी बातों ने ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात झळकले होते. त्यानंतर आता त्यांना अखरेचा चित्रपट ‘इक्कीस’ हा येत्या 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...