जेव्हा खऱ्या रेहमान डकैतच्या हत्येने हादरलेला पाकिस्तान, अशी निघालेली अंत्ययात्रा, काही फोटो पाहून म्हणाल…

दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना याने गुंड रेहमान डकैत याची भूमिका साकारली. पण ज्याप्रमाणे रेहमान याची भूमिका रंजक करुन दाखवण्यात आली. त्या उलट रेहमान याच्या हत्येनंतर पाकिस्तान हादरलेला... सध्या त्यांच्या अंत्यसंस्काराचे काही फोटो समोर आले आहेत.

जेव्हा खऱ्या रेहमान डकैतच्या हत्येने हादरलेला पाकिस्तान,  अशी निघालेली अंत्ययात्रा, काही फोटो पाहून म्हणाल...
Rehman Dakait
| Updated on: Mar 20, 2026 | 11:18 AM

दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमानंतर ‘धुरंधर 2’ सिनेमा चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. सिनेमा सत्य घटनांवर आधारित असला तरी, सिनेमातील स्पाय एजेंट काल्पनिक आहेत. पण त्यांच्या भोवती फिरणाऱ्या सर्व भूमिका खऱ्या आहे आणि सिनेमा देखील सत्य घटनांवर आधारित आहे. सिनेमात ल्यारीतील कुख्यात गँगस्टर रेहमान डकैत याला देखील दाखवण्यात आलं आहे. अभिनेता अक्षय खन्ना याने रेहमान याच्या भूमिकेला न्याय दिला. अक्षय याने साकारलेली भूमिका इतकी अप्रतिम होती की, सिनेमा हीट ठरला.

डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’मध्ये रेहमान डकैत याला ल्यारीचा राजा म्हणून दाखवण्यात आलं आहे, ज्याला कोणीही हरवू शकत नाही. रणवीर सिंगचं पात्र, हमजा, पोलीस अधीक्षक (एसपी) चौधरी अस्लम यांची मदत घेऊन त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो. सिनेमात एका जबरदस्त एनकाउंटरमध्ये एसपी अस्लम, रेहमान डकैत याची हत्या करतो… पण खऱ्या आयुष्यात असं काहीही घडलं नव्हतं…

कशी करण्यात आली रेहमान डकैत याची हत्या?

‘धुरंधर’मध्ये अनेक सत्य घटना दाखवण्यात आल्या आहेत, ज्या प्रेक्षकांसमोर काल्पनिकतेचा मुलामा देऊन सादर करण्यात आल्या. रेहमान डकैत एका एनकाउंटरमध्ये मारला गेलेला, हे खरं आहे, पण तो एक बनावट एनकाउंटर होता. पोलीस अधीक्षक (एसपी) चौधरी अस्लम यांनी लयारीमध्ये रात्री उशिरा रहमान डाकू आणि त्याच्या टोळीतील काही सदस्यांना ठार मारले होते. 9 ऑगस्त 2009 मध्ये रेहमान याची हत्या करण्यात आली. सिनेमात हे एका वेगळ्या प्रकारे दाखवण्यात आलं आहे.

‘धुरंधर’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर रेहमान डकैत याच्या मृत्यूचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये त्यांच्या अंत्यसंस्काराचे देखील काही फोटो आहेत. तेव्हा, रेहमान डकैत याच्या निधनाने संपूर्ण पाकिस्तानला मोठा धक्का बसलेला.

सांगायचं झालं तर, रेहमान पाकिस्तानचा सर्वात मोठा गुंड होता. हे सर्व इतिहासकारांना माहिती होत. पण ‘धुरंधर’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आला. या सिनेमाने रेहमान डकैत आणि एसपी चौधरी अस्लम यांच्यातील वैरही उघड केलं. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या सिनेमाबद्दल सांगायचं झाल्यास, सिनेमा 19 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमात रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Follow Us